*आरोग्यदूत डॉ जितेंद्र ठाकूर यांचे तऱ्हाडी येथे मोफत आरोग्य शिबिर*




*आरोग्यदूत डॉ जितेंद्र ठाकूर यांचे तऱ्हाडी येथे मोफत आरोग्य शिबिर*

शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते‌.शिरपूर तालुक्याचे आरोग्यदूत डॉ जितेंद्र ठाकूर यांच्यासह तज्ञ डॉक्टरांकडून यावेळी रुग्णांची तपासणी करत उपचार करण्यात आले.

शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथे आरोग्य दूत डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून श्री सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतीबाराव फुले जन आरोग्य योजना माध्यमातून गरजू रुग्णांची तपासणी करत उपचार करण्यात आले.

तऱ्हाडी येथील स्व. आण्णासो. साहेबराव सोमा पाटील माध्य.विद्यालय व ज्यु.सायन्स कॉलेज येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भिकनराव भामरे,सुनील धनगर, ज्ञानेश्वर भामरे, रावसाहेब चव्हाण,किरण भामरे,योगेश पाकळे, प्रफुल्ल पाटील,  योगेश प्रताप पाकळे, अशोक भामरे आणि तऱ्हाडी ग्रामपंचायत यांचे शिबीरासाठी सहकार्य लाभले. आरोग्यदूत डॉ जितेंद्र ठाकूर यांनी प्रत्यक्ष गावात येऊन तज्ञ डॉक्टरांच्या वतीने रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेतल्याने डॉ जितेंद्र ठाकूर यांचे उपस्थितांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने