मेहरगाव येथील वृद्ध,पोलीस पाटील यांचा सतर्कतेने नातेवाईकांचा स्वाधीन




मेहरगाव येथील वृद्ध,पोलीस पाटील यांचा सतर्कतेने नातेवाईकांचा स्वाधीन


शिरपूर तालुक्यातील आढे येथे काल संध्याकाळी ६:३० वाजण्याचा दरम्यान आढे येथील पावरा परिवाराचा अंगणात एक वृद्ध गृहस्थ आला.त्यांना त्यांनी गावाचे नाव व नाव विचारले असता त्यांना सांगता येत नव्हते.त्यांचा जावई यांनी आढे येथील पाटील पाटील राजकिरण राजपूत यांना फोन करून त्याची माहिती दिली.क्षणाचाही विलंब न करिता पोलीस पाटील राजकिरण राजपूत त्या ठिकाणी आले.त्यांनी त्या बाबांना नाव,गाव,नातेवाईक आदींची विचारपूस केली.त्यांना गावाचे व स्वतःचे नाव सांगता येत नव्हते.त्याचा खिशामध्ये आधार कार्ड मिळाले.आधारकार्ड वर त्यांचे नाव तुळशीराम काशीराम भामरे,वय 90 वर्ष,गाव मेहरगाव ता.जि.धुळे अशी माहिती मिळाली.पाटील यांनी त्या आधारकार्ड चे फोटो पोलीस पाटील यांच्या ग्रुपवर व्हायरल केले.थाळनेर येथील बिट अंमलदार गांगुर्डे यांना माहिती दिली.मेहरगाव येथील पोलीस पाटील आणि ग्रुपवरील सहकारी पोलीस पाटील यांचा मदतीने दिड तासांमध्ये त्यांचा नातेवाईकांचा शोध लागला.रात्री पाऊणे नऊ वाजता बाबांचा नातुकडे आढे येथील पाटील यांनी त्यांना स्वाधीन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने