रोटरी स्कूलमध्ये बाप्पाच्या देखाव्यासाठी आयफेल टॉवर व ऑलिंपिक वर्तुळांची प्रतिकृती* दोडाईचा-अख्तर शाह

.


रोटरी स्कूलमध्ये बाप्पाच्या देखाव्यासाठी आयफेल टॉवर व ऑलिंपिक वर्तुळांची प्रतिकृती*
 दोडाईचा-अख्तर शाह   

दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूल व श्रीमती बसंतीबाई पाबुदानजी संचेती रोटरी प्री- प्रायमरी  इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी प्री-प्रायमरी स्कूल, रोटरी मार्ग येथे श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना संस्थाध्यक्ष श्री. हिमांशु शाह व सौ.हेतल शाह यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक, सकाळचे पत्रकार श्री विजय बागल, समन्वयक श्री प्रशांत जाधव, इंचार्ज बतुल बोहरी, अंजू वालेचा, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
 या गणेशोत्सवानिमित्त  पॅरिसमधील एक जगप्रसिद्ध वास्तू म्हणून ओळखली जाणारी आयफेल टॉवरची व ऑलिंपिक ध्वजावरील पांढऱ्याशुभ्र पार्श्वभूमीवरील जगाला  मित्रत्वाची साक्ष देणाऱ्या वर्तुळांची प्रतिकृती गणरायाच्या देखाव्यासाठी साकारण्यात आली आहे. 
तसेच पॅरिस येथील 2024 च्या ऑलिंपिक सामन्यात  निरज चोप्रा, मनुभाकर, स्वप्निल कुरुळे, अमन सेहरावत, सरबजोत  सिंग व हॉकी संघाच्या भारतीय खेळाडूंनी ऑलिंपिक सामन्यात पराक्रमाच्या जोरावर मिळविलेल्या यशाची माहिती चित्रीकरणाच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे.
 या उत्सवानिमित्त रविवार दि.8 सप्टेंबर 2024 ते गुरूवार दि. 12 सप्टेंबर 2024 पर्यंत संध्याकाळी 7:30 वाजता विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक व सामुहिक नृत्य, गीतगायन, वादन, नाट्याभिनय इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अशा ज्ञानपर व मनोरंजनात्मक  कार्यक्रमाला पालकांनी व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन स्कूलच्या वतीने  करण्यात येत आहे. 
देखावा साकारण्यासाठी प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक  यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाल  ढोले, विकास बाटुंगे,मनोज भिल ,जाफर मिर्झा,भटू ठाकूर, सतिश पारधी, कपिल बागल यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने