कंत्राटी गृहनिर्माण अभियंता दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक
नंदुरबार प्रतिनिधी सुमित गिरासे
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा पंचायत समिती मधील कंत्राटी गृहनिर्माण अभियंता निलेश प्रकाश पाटील वय 27 वर्ष यांना तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना लाच लूचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांनी रंगेहात अटक केली आहे.
तक्रारदार यांच्या नावे शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर आहे. तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुलाच्या अनुदानाचे तीन हप्ते पंचायत समिती तळोदा येथून तक्रारदार यांना प्राप्त झाले आहेत परंतु अनुदानाचा चौथा हप्ता प्राप्त होणे बाकी आहे. तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुल अनुदानाचा चौथा हप्ता तक्रारदार यांना प्राप्त होण्यासाठी तक्रारदार यांच्या घराचे फोटो काढून पुढील कारवाई करून चौथा हप्ता मिळवून देण्यासाठी नमूद आलोसे याने तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचेच्या रकमेची मागणी केली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत आलोसे निलेश प्रकाश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या अनुषंगाने पंचांसमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली आहे. याबाबत तळोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.
सदरची कारवाई मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक ,मा .श्री माधव रेड्डी,अपर पोलिस अधीक्षक,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. श्री स्वप्निल राजपूत,वाचक, पोलीस निरिक्षक, ला.प्र.वि. नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती नेहा सूर्यवंशी , पोलीस निरीक्षक , लाप्रवि नंदुरबार, पर्यवेक्षण अधिकारी श्री राकेश चौधरी पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि,नंदुरबार आणि कारवाई पथक
पोहवा/ विजय ठाकरे पोहवा/देवराम गावित,
सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार.
पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार , पोहवा/ विलास पाटील , पोना/ संदीप खंडारे , पोना/ सुभाष पावरा, पोना/नरेंद्र पाटील , पोना/हेमंत महाले , पोना/ जितेंद्र महाले , सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यांच्या पथकाने केली आहे.
यासंदर्भात विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नंदुरबार येथे संपर्क करावा.*
दुरध्वनी क्रमांक-
02564-230009,
*टोल फ्री क्रमांक 1064 .*
