**दोडाईचा येथे नगर परिषद शाळा क्र.११ शिक्षक दिन मोठ्या**
**उत्साहात साजरा.**
*आदर्श व्यक्तिमत्व हा एक शिक्षकही असू शकतो*
दोडाईचा -(मुस्तुफा शाह)
दोडाईचा येथे न.पा.शाळा क्र ११ येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी
शाळेतील चिमुकल्यांनी
विद्यार्थ्यांनी भाषण व नाट्य इत्यादी छान छान पद्धतीने सादर केले.
नियोजनानुसार शाळेतील काही विद्यार्थ्यांनी आज अध्यान व अध्यापनाचे कार्य ही केले.
भारताचे माजी उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी शिक्षक
अध्यक्ष दोंडाईचा बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री. डी.एस.सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मा.श्री. संजय के. चंदणे (प्राचार्य आर.डी.एम. पी.हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दोंडाईचा व मा.श्री. विकास देव्हारे केंद्र प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मा.डी.एस. सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व
मार्गदर्शन केले
एक आदर्श व्यक्तिमत्व हे एका शिक्षकाचे ही असू शकते कारण तो आपला संपूर्ण जीवन लहान मुलांना शिक्षित करण्यात व्यक्त करतो.तसेच यावेळी
चंदणे सरांनी एक छानसे गीत सादर केले.
आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत व सत्कार मुख्याध्यापक अन्सारी हबिबुरर्हेमान मुख्यापक
यांनी केले. अन्सारी मो. सलमान यांनी प्रास्तावना केले
सूत्रसंचालन शेख खलील धोबी केले
आभार मुजम्मिल अखतर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीशी करण्यासाठी अन्सारी हबिबुरर्हेमान, धोबी खलील शेख, अन्सारी मो. सलमान,
मुजममिल अख्तर व अनिला शेख. आदिनी परिश्रम घेतले.
