भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेतर्फै आदिवासी अधिकार परिषद चे आज आयोजन



  भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेतर्फै आदिवासी अधिकार परिषद  चे आज आयोजन

शिरपूर = सांगवी  ता.शिरपूर जि धुळे.
येथे दिंनाक 16/09/2024रोजी  दुपारी ठीक 2वाजता  आदिवासी आधिकार परिषद  आयोजित करण्यात आली या परिषदेचे उध्दघाटक म्हणून  काॅम्रेड डाॅ.भालचंद्र कांगो ,राष्ट्रीय सचिव भाकप, परिषदेचे अध्यक्ष काॅ.प्रा.राजु देसले,राज्य सहसचिव भा.क.प.
प्रमुख उपस्थितीत  खासदार अँड गोवाल  पाडवी,काॅ.अँड  सुभाष लांडे 
 राज्य  सचिव भा.क.प महाराष्ट्र 
हे प्रमुख वक्ते या परिषेदस मार्गदर्शन करतील. 
या परिषदेत अनेक ठराव मांडले जातील.वनहक्क अधिनियम हा कायदा वनजमिन कसणारे शेतकर्याना साठी  2006मध्ये पारित करण्यात आला .तरी आज पावेतो वन जमिन कसणारे असंख्य बांधवाना अजुन पावेतो 7/12 मिळत नाहि.त्याचा अधिकारासाठी!
वनजमीन चे फेटाळलेले दाव्यांना  पुन्हा रिव्हिजन दाखल करण्याचा अधिकारा साठी!  
जे फॉर्म धारक वनजमीन धारक काना 2024ची खरीप पिकाची पिक पाहणी लावण्यास फाॅरेस्ट विभागाकास भाग पाडण्याचा आधिकारा साठी ! आदिवासी चा न्याय हक्काची लढाईसाठी आदोंलनाचे रणशिंग फुंकले जाणार आहे. म्हणूनच परिषदेचे आयोजन भारतीय कम्युनिस्ट पक्ष  व महाराष्ट्र राज्य किसान सभेने केलेले आहे.
तरी आपण  या परिषदेस  प्रंचड संखेने उपस्थित राहावे.असे आव्हान भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे  व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे पदाधिकारी करीत आहेत. 

पेसा कायद्याचा अमंलबजावणी साठी!
आदिवासी बांधवाना लवकर न्याय मिळवा म्हणून शिरपुर येथे अतिरिक्त सत्र न्यायालय,दिवाणी न्यायालय वरिष्टर न्यायालय स्थापन करून आदिवासी बांधवाचा वेळ पैसा वाचले  व लवकर न्याय मिळण्याचा अधिकारासाठीच या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
वरील मागण्यांबाबत ठराव मंजूर करुन शासनाकडे  पाठपुरवा करण्यात येणार आहे.
तरी आदिवासी बंधु भगिनींनी 
दिंनाक =सोमवारी 16/09/2024रोजी 
दुपारी 2/00वाजता सागवी , बोराडी फाटा जवळ किसान सभेचा कार्यालय समोर उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने