टोल कंपनी व निकृष्ट टोल रोड चा अनोखा निषेध
महामार्गावरील खड्ड्यामध्ये बसून सार्वजनिक अंघोळ
शिरपूर -राष्ट्रीय महामार्ग ३, मुंबई आग्रा महामार्गावर पलासनेर ते धुळे दरम्यान जीवघेणे खड्डे झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शिरपूर फर्स्टने अनधिकृत टोल वसुली विरोधात जनआंदोलन उभे केले आहे.
शिरपूर व सोनगीर टोलच्या माध्यमातून मुंबई - आग्रा महामार्गाच्या खर्चापेक्षा दुपटीहून जास्त रक्कम वसूल करूनही मुंबई-आग्रा महामार्ग वर टोल आकारून नागरिकांकडून लूट केली जात आहे.
आज महामार्गाचे अवस्था इतकी ढिसाळ आहे, इथे प्रवासी आपला जीव मुठीत ठेऊन प्रवास करतो, अनेक ठिकाणी जिथे महामार्गाचे दुरुस्तीकरण झाले होते, तो रस्ता पाऊसामुळे वाहून गेला.
महामार्गाच्या लागत रक्कम पेक्षा जास्त इथे टोल वसुली झाली. ५० किलोमीटरसाठी वाहनधारक २१० रुपये मोजतात तरी रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे.
आज शिरपूर फर्स्टच्या वतीने दहिवद फाटा जवळ महामार्गावर असलेल्या खड्ड्यामध्ये बसून सार्वजनिक अंघोळ करण्यात आली. हा महामार्गा गाडी चालवण्यासाठी नाही इथे फक्त बैलगाडी चालू शकते आणि सार्वजनिक अंघोड करू शकतो असे शिरपूर फर्स्टचे पंकज मराठे, हंसराज चौधरी यांनी सांगितले..
उड्डाणपूलमुळे टोल आकारला जातो असे वारंवार टोल प्रशासनांकडून सांगण्यात येते पण आज त्या उड्डाणपूलची अवस्था एक गाव-खेड्याच्या रस्त्यासारखी झाली आहे. पावसाळा सुरू आहे महामार्गावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे आहेत. मागील काही काळापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे, पण तरी यावर टोल प्रशासन व न्हाई काम करत नाही फक्त टोल वसुलीसाठी काटेकोर नियम येथे पाळले जातात.
महामार्गावर तापी नदीवर असलेल्या उड्डाणपूलला कुठलेही संरक्षण नाही. रोज होणाऱ्या आत्महत्या यांना आळा घालण्यासाठी इथे संरक्षण जाळी असणे गरजेचे आहे. यावर ही टोल प्रशासन न्हाई उत्तर देत नाही. वाहनधारकांनी टोल भरतेवेळी प्रश्न विचारल्यास हुज्जत घातली जाते. टोल प्रशासनाच्या तांत्रिक अडचणी मुळे देखील येथील वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो व वाहतूक कोंडी सातत्याने होत असते.

