या गाव परिसरात येत आहेत जमिनीतून स्फोट सदृश्य आवाज,ग्रामस्थांमध्ये आहे भीतीचे वातावरण




या गाव परिसरात येत आहेत जमिनीतून स्फोट सदृश्य  आवाज,ग्रामस्थांमध्ये आहे भीतीचे वातावरण 

शिरपूर प्रतिनिधी -  शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत आंबे अंतर्गत मौजे धवडीविहीर या गावात जमिनीतून स्फोट सदृश्य आवाज येत आहेत अशी तक्रार या परिसरातील लोकांची आहे. याबाबत प्रशासनाने तज्ञांची समितीमार्फत चौकशी करून नेमका हा प्रकार काय याबाबत लोकांच्या संभ्रम दूर करावा अशी मागणी या गाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

 ग्रामपंचायत आंबे अंतर्गत धवडीविहीर हे महसुली गाव असून मागील दोन महिण्यापासून जमिनीतून स्फोट सदृश्य आवाज येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या 7 तारखेपासून सदर आवाज येत असून त्या बाबत ग्रामपंचायत मार्फत मा. तहसिलदार सो शिरपूर, मा. प्रांत अधिकारी शिरपूर यांना लेखी कळविण्यात आले आहे. तसेच आंबे गावातील सरपंच तसेच गावातील ग्रामस्थांनी मा. प्रांत साहेब यांचेशी दिनांक 18/9/2024 रोजी प्रत्यक्ष भेट घेवून घटनेची माहिती देखील देण्यात आली. त्या बाबत मा. प्रांत अधिकारी सो यांनी दिनांक 19/9/2024 रोजी प्रतेक्ष गावात जावून घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच दिनांक 19/9/2024 रोजी जिल्हा स्तरावरून भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी श्री. गिरिषकुमार भोरे वरिष्ठ भवैज्ञानिक व श्री योगेश धनवंत पाटील कनिष्ठ भूवैज्ञानिक यांनी गावास भेट दिली. त्यावेळी गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेव्हा गावातील लोकांनी सांगितले की, जमिनीतून स्फोट सदृश्य आवाज हा पहिल्यांदा 2022 मध्ये आला होता. या वर्षी मात्र ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यापासून सतत येत असून स्फोटाची आवाजाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. जमिनीतून येणाऱ्या स्फोटाची तीव्रता वाढत असून सदर स्फोटाचा आवाज जवळच्या भूपेशनगर, अमरीशनगर, बोरमळी, अंजनपाडा व आंबे गावापर्यंत आवाज येत आहे. काहीवेळा स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने घरातील भांडी देखील जमिनीवर पडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिक घरात थांबायला घाबरत आहे. जिल्हास्तरावरील भूवैज्ञानिक गावास भेट देवून 8 ते 10 दिवस होत आले तरी काहीच निष्पन्न झालेले नाही. जमिनीतून येणाऱ्या स्फोटाचा आवाज दिवसेंदिवस वाढतच असून गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण  वाढतच आहे. लवकरात लवकर सदर गावात तज्ञ भूगर्भ शास्त्रज्ञ यांचेमार्फत चौकशी होवून जमिनीतून येणाऱ्या स्फोटाचे आवाजाचे गूढ उकल्यान यावे व ग्रामस्थांमधील भिती दूर करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने