राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा शिरपूर शहरात, तालुक्यातील नागरिकांना उपस्थितीचे आवाहन
शिरपूर प्रतिनिधी - राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शिवस्वराज्य यात्रा शहरात येत असून त्यानिमित्ताने दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता विजयस्तंभ जवळ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिरपूर विधानसभा मतदार संघाच्या वतीने शिरपूर येथे शेतकरी वर्ग, तरूण युवा वर्ग, माता - भगिनी, आदिवासी - दलित बांधव, अल्पसंख्यांक बांधव यांच्याशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी जलसंपदा मंत्री मा. जयंतरावजी पाटील, स यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ.अमोलजी कोल्हे, आ. जितेंद्रजी आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख, प्रदेश प्रवक्ते आणि शिवव्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी, प्रदेश प्रवक्ते श्री. कराळे गुरुजी, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष श्री. पंडीत कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षक श्री. उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र मराठे यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन धुळे जिल्हा व शिरपूर तालुका व शहर कार्यकारिणीच्या वतीने डॉ. जितेंद्र ठाकूर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार,डॉ. मनोज महाजन (युवक जिल्हाध्यक्ष ),श्री दत्तू पाडवी (तालुकाध्यक्ष ),श्री हेमराज राजपूत (शहराध्यक्ष ),समाधान पाटील (युवक तालुकाध्यक्ष),अनिल वाडीले (युवक शहराध्यक्ष),
सौ चंद्रकला बोरसे (तालुकाध्यक्ष महिला आघाडी),सौ स्नेहलता सोनी (शहराध्यक्ष महिला आघाडी) ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
