शहादा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसान, आमदार राजेश पाडवी यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेती पिकाची व झालेल्या नुकसानीची पाहणी





शहादा तालुक्यातील  अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसान, आमदार राजेश पाडवी यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेती पिकाची व झालेल्या नुकसानीची पाहणी 


शहादा तालुक्यातील सुलतानपूर सुलवाडा मुबारकपूर बहिरपुर खरगोन बिलाडी तह या भागात मागील काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असता आमदार राजेश पाडवी यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेती पिकाची व झालेल्या नुकसानीची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. 

शहादा तालुक्यातील सुलतानपूर सुलवाडा मुबारकपूर बहिरपुर खरगोन गोदीपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्य झाल्याने शेती पिकातील नुकसान झाले शेती पिकाचे नुकसान झाले. तसेच नदीच्या आलेल्या पुराने किनाऱ्यावरील शेतीचा भाग मोठ्या प्रमाणावर नदीत वाहून गेल्याने किनाऱ्यावरील शेतकऱ्यांची शेतीचे क्षेत्र नदीचे रूपांतर आल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अल्पभूधारक झाल्याचे दिसून येते, यावेळी आमदार राजेश पाडवी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यां समवेत पाहणी करत पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. 

यावेळी मतदार संघाची परिस्थिती नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अनिलजी पाटील साहेब यांना दूरध्वनी द्वारे लक्षात आणून दिली. 

या नुकसानग्रस्त भागात पाहणी करताना आमदार राजेश पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण ,सरपंच मोहन आवास ,संजय पाटील हिरालाल पाटील, डॉ. विजय चौधरी, रमाशंकर माळी, अंतू पाटील, निलेश मतकर, विनोद पाटील, विनोद जैन, कृषी अधिकारी काशीराम वसावे ,हिरालाल पाटील गणेश बागुल, गोपाल पावरा,अर्जन पावरा,नामदेव वळवी,विठ्ठल ठाकरे, दिलवर पावरा, संजय खर्डे, भारत पावरा, अनिल रावताळे ,नानू तडवी,कार्तीक पावरा, काशिनाथ सोनार, भरत सोनवणे, व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने