शेल्टी येथे भजनी मंडळाकडून व्यसनाची तसेच वृक्षारोपणावर आधारित भजने सादर करुन जनजागृती.
शेल्टी येथे अनेक वर्षांपासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व तसेच देवदेवतांवर, वृक्षारोपणावर, व मयतच्या ठिकाणी भजन मंडळातर्फ भजन म्हटली जात असतात. मात्र शहादा तालुक्यातील शेल्टी येथील संत तुकाराम महाराज भजनीमडंळातर्फ तसेच ग्रामस्थाच्या मदतीने अखंड हरिनाम किर्तन सप्ताह 23 वर्षा पासुन सुरळीत पणे चालु असुन पुढेही चालुच राहिल व व्यसन व वृक्षारोपणावर आधारित भजन सादर करित समाजामध्ये ऐकतेची भावना निर्माण करुन जनजागृतीचे कार्य करण्यात येत आहे.
संत तुकाराम महाराज भजनीमडंळ गावा गावात जावुन व्यसना पासुन आपल्या जीवनावर व त्यापासून उध्वस्त झालेल्या कुटुंबावर भजन सादर करून सेवा ग्रामस्थां मध्ये एक वेगळा ठसा उमटवीत आहेत या मंडळात भारुडच्या माध्यमातून देखिल व्यसनापासून मुक्ती कशी मिळेल या विषयी माहिती देण्यात येत आहे यावेळी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रदीप हिंम्मत पाटील उपाध्यक्ष ह.भ.प. आनंदराव सिताराम पाटील सदस्य रवींद्र सुकलाल पाटील, हिंम्मत भुता पाटील, यशवंत लोटन पाटील, युवराज आसाराम पाटील, सिताराम आनंदा पाटील, संतोष तुकाराम आखडमल, विकास सिताराम पाटील, राकेश ब्रिजलाल पाटील, पारस दिलीप सावळे, उज्ज्वल गिरासे, हर्षराज पुंडलिक पाटील, चंद्रशेखर भिक्कन पाटील, संदिप पाटील, छगन तुकाराम मराठे.
उपस्थित होते मंडळातर्फ जिल्हाभर भजन मंडळाकडुन विविध कार्यक्रम राबविण्यात येत असुन व्यसनमुक्ती व वृक्षारोपणपर आधारित भजन करुन जनजागृती करीत उपस्थित ग्रामस्थ तसेच नागरिकांकडून दाद मिळवित आहेत तसेच शासनातर्फ व्यसनमुक्त व वृक्षारोपण साठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून यात भजनीमडंळातर्फही जनजागृतीचे काम केले जात आहे.
Tags
news
