महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे धरणे आंदोलन
दिंनाक 12/08/2024रोजी कृषि आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फै
धरणे आंदोलन करुन निवेदन देण्यात आले.
आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर,महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अँड हिरालाल परदेशी,किसान सभेचे जेष्ठ नेते मधुकर पाटील,किसान सभेचे उपाध्यक्ष अँड बन्सी सातपुते,सचिव अशोक सोनारकर,काॅ लता भिसे ,आत्माराम भिसे, रमेश जाधव,संतोष धोडगे,अमरावती,परभणी,धुळे,अहमदनगर,ठाणे,पालघर,पुणे इत्यादी जिल्हातील किसान सभेचे कार्यकर्तै उपस्थित होते.
कृषि संचालक आवटे याना मागण्यांबाबत निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.मराठवाड्यातील कृषि विभागाचा रिक्त जागा त्वरित भरा असे देखिल निवेदन देण्यात आले.कृषिआयुक्तचा कार्यालयासमोरील आदोंलन यशस्वी या साठी झाले की किसान सभेची पिकविमाबध्दल्लची भुमिका योग्य असल्याची व या पिकविमा योजनेतुन कंपन्याचा फायदा झाल्याचे दिसुन आले.तीन वर्षांत 14000कोटी रुपये शासनाने विमा कंपनीना दिले आहेत.
शेतकर्याना फक्त 12हजार कोटी मिळाले आहेत.
2हजार कोटी नफा विमा कंपनीना मिळालेला आहे.अशी हि पिक विमा फसवी असल्याचे सिध्द झाले आहे.कृषि विभाग कंपनीवर नियंत्रण नाही.
असे या निवेदनात नमूद केले आहे आणि विविध मागण्या सादर केल्या आहेत.
