बोहरा बांधवांकडून धर्मगुरूंचा वाढदिवस साजरा




बोहरा बांधवांकडून धर्मगुरूंचा वाढदिवस साजरा

शिरपूर -  शहरातील दाऊदी बोहरा बांधवांनी समाजाचे ५३ वे धर्मगुरू डॉ. सय्यदना मुफ्फद्दल सैफुद्दीन यांचा ७७ वा वाढदिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला.  शिरपूर येथील उमुर खारिजिया आणि सेहत ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बद्री मशिदीत धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यासोबतच शासकीय उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना बद्री मशिदीचे जनाब युसुफ 
यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले. यावेळी बोहरी समाजबांधव एफएमबी पदाधिकारी आणि बोहरी मदरशाच्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला. यावेळी ताहेर बोहरी,जु़जर बोहरी, हकीम बोहरी, आरिफ बोहरी, हसन बोहरी, अबदेली बोहरी, मुस्ताफा बोहरी, अदनान बोहरी, जियाउद्दीन बोहरी 
शब्बीर बोहरी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने