एसपीडीएम प्राध्यापक प्रबोधिनी कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप
येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एसपीडीएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक प्रबोधिनी कडून किसान छात्रालय वरवडे शिरपूर येथील २६० विद्यार्थ्यांना रजिस्टर, पेन, परीक्षा पॅड असे एकूण ३१००० रुपयाचे शैक्षणिक साहित्य किसान विद्या प्रसारक संस्था अध्यक्ष माननीय डॉ.तुषारजी रंधे यांच्या पुढाकाराने जागतिक आदिवासी दिनानिमित्त वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव माननीय श्री निशांतजी रंधे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एस. राजपूत उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी प्राध्यापक प्रबोधिनी कडून महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.एफ एम. बागुल, उपप्राचार्या डॉ एस पी महिरे, प्राध्यापक डॉ सी एम पावरा, प्राध्यापक डॉ एम बी वाघ, प्राध्यापक डॉ दिनेश भक्कड, प्रा.व्हि.बी.चौधरी, प्रा एन एन बनसोड, प्रा पी जी पारधी, डॉ एल के प्रताळे, डॉ व्हि एम पाटील, डॉ एम व्हि पाटील, डॉ एस ए आठवले, डॉ एन एस डोंगरे, डॉ एस बी कांबळे, डॉ भारती वळवी, डॉ कविता धर्माधिकारी, प्रा सुरेखा देवरे, डॉ स्वाती विहिरे, डॉ मनीषा पाटील, डॉ मनीषा वर्मा, प्रा. दिनेश पाटील, डॉ संदीप चौधरी, प्रा सागर पटेल, प्रा उमेश पाटील, प्रा संघरत्न तायडे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदर शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयातील नुकतीच पदोन्नती प्राप्त वरिष्ठ प्राध्यापक डॉ सी एम पावरा, डॉ एम बी वाघ, डॉ दिनेश भक्कड यांनी संयोजन व परिश्रम घेतले.
