*दोंडाईचा शहरात स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून शहिदांचे माता पितांचे सन्मान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गट तालुका जनसंपर्क कार्यालय चे लोक अर्पण...**




**दोंडाईचा शहरात स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून शहिदांचे माता पितांचे सन्मान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गट तालुका जनसंपर्क कार्यालय चे लोक अर्पण...**

**मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या शुभ हस्ते**

कार्यमाचे आयोजन 
राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष दिपक गिरासे 

दोडाईचा-(अख्तर शाह)
स्वतंत्र भारताचा ७८वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपूर्ण देशभरात साजरा केला जातोय. धुळे जिल्हात देखील ठिकठिकाणी
स्वातंत्र्यदिना निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर दोंडाईचा तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गिरासे यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत वीर शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान व गुण गौरव तसेच पत्रकारांचा सन्मान सोहळा पार पडला. तसेच यावेळी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते तालुका राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाचं लोकार्पण करण्यात असून या कार्यक्रमाबाबत आयोजक दीपक गिरासे यांनी अधिक
माहिती दिली आहे. या दरम्यान मंत्री अनिल पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्याबरोबरच विरोधक करत असलेला टीकेला प्रत्युत्तर देत असताना महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं तरी या योजना वर्षांनूवर्ष सुरू राहतील अस आश्वासन दिलं आहे. याच बरोबर या स्तुत्य कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या आयोजक दीपक गिरासे यांच देखील मंत्री पाटील यांनी भरभरून कौतुक केलंय व त्यांच्या वाढदिवसा चा केक कापण्यात आला दरम्यान कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी व युवक चे प्रदेश कार्यकारणीचे सदस्य तसेच शहिदांचे माता पिता, तालुका अध्यक्ष व उपाध्यक्ष हजर होते. 
      महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती देखील यावेळी करण्यात आली या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, माजी आमदार रामकृष्ण पाटील, महिला जिल्हाध्यक्ष पूजा खडसे, जिल्हाध्यक्ष अ.भा.महासभा प्रतिष्ठा गिरासे, कॅप्टन योगेंद्रसिंग राजपूत, सुभेदार रामसिंग गिरासे, युवकचे जिल्हाध्यक्ष सुमित पवार, योग्य जिल्हा कार्याध्यक्ष आशिष अहिरे, रजेसिंग गिरासे सरपंच दलवाडे, युवक प्रदेशचे सचिव ऋषिकेश पिंगळे, तालुका अध्यक्ष दीपक जगताप, ओबीसी जिल्हाध्यक्ष ईश्वर माळी, डॉ. भरत राजपूत, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नाजीम शेख, सामाजिक न्यायचे तालुका अध्यक्ष हर्षदीप वेंदे, तालुका उपाध्यक्ष चिंधा गिरासे, संपादक जितेंद्र गिरासे, महेंद्र राजपूत, तालुका युवक चे गणेश पाटील, अमृत पाटील, प्रदीप बागल, लिलेश देसले, संदीप देसले, भिका पाटील, गोपाल कोळी, महेंद्र माळी,  विकास बागुल, अमोल साळवे, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष रईस शेख. उपाध्यक्ष अयाज मिर्झा  
यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी दीपक गिरासे यांच्या वाढदिवसाचां केक कापण्यात आला व व मंत्री महोदय अनिल पाटील साहेब यांच्या हस्ते खाऊ घालण्यात आला. सर्वच कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदावर पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने