शिरपूर तालुक्यात उज्वला गॅस योजनेअंतर्गत भ्रष्टाचाराचा आरोप




शिरपूर तालुक्यात उज्वला गॅस योजनेअंतर्गत भ्रष्टाचाराचा आरोप

शिरपूर - केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना उज्वला गॅस योजना , या योजनेअंतर्गत गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन आणि सौवलतीच्या दरात गॅस सिलेंडर भरण्यासाठी सवलत देण्यात येते. सरकारकडून मोठ्या प्रमाणात या योजनेच्या गाजावाजा करण्यात आला आहे. 


मात्र शिरपूर तालुक्यात या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अशिक्षित नागरिकांच्या विश्वासात झाला असेल या योजनेअंतर्गत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जितेंद्र राठोड आणि युवा सेना विभाग प्रमुख चेतन जाधव यांनी केला आहे.

या बातमीच्या व्हिडिओ पहा

https://youtu.be/FslYVZBD010?si=AUHeLbgypz4PZtis


भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारने उज्वला नावाच्या योजना आणली त्यानंतर ती मोफत देण्याच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला तर नंतर केंद्र सरकारच्या दळभद्री कारभाराच्या पार्श्वभूमीवर गॅसचे दर प्रचंड वाढवण्यात आले त्यानंतर सर्वसामान्य महिलांना ते पुन्हा गॅस भरता आले नाही, तदनंतर शिरपूर तालुक्यातील अजून अन्यायकारक प्रकार घडला आहे त्यात घडला असं की शिरपूर तालुक्यातील  अनेर गॅस इंडियन एजन्सी (तोंदे) द्वारे उज्वला कनेक्शन देण्यात आले, त्या कनेक्शनच्या बदल्यात लोकांकडून 1200,2400 अशी रूपये घेण्यात आले, त्या बदल्यात जनसामान्य माता-भगिनींना गॅस हंडी आणि फक्त रेगुलटर देऊन , गॅस शेगडीचे वितरण करण्यात आले नाही आणि मोठा भ्रष्टाचार  झाला असा आरोप केला आहे. या भ्रष्टाचारात गावपातळीच्या अनेक भारतीय जनता पार्टीच्या पुढार्‍यांचा हात असल्याचा आरोप जितेंद्र राठोड यांनी केला.  भाटपुरा आणि अजनाड येथील नागरिकांनी या सर्व प्रकाराची तक्रार जितेंद्र राठोड यांच्याकडे करताच सर्व घटनेची माहिती राठोड यांनी  घटनेची माहिती तत्कालीन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सेल्स ऑफिसर स्थानिक स्तरावरील चौकशी केली आहे, महिलांना घेतलेले पैसे परत देऊन जे उज्वला योजनेत साहित्य मिळत असते ते पूर्ण साहित्य मिळावे तसेच दोशींवर कडक  कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली गेली आहे.मात्र अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसून  सर्वसामान्य महिलांना न्याय न मिळाल्यास 15 ऑगस्ट ला तहसील कार्यालयासमोर महिला समवेत आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी राठोड यांनी दिला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने