गुजरात राज्यातून डंपरची चोरी करणारे सराईत आरोपी शिरपूर शहर पोलिसांच्या ताब्यात
शिरपूर प्रतिनिधी - गुजरात राज्यातून डंपर ची चोरी करून ते शिरपूर शहरात आणल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या वाहनाचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले होते. या चोरीबाबतच्या गुन्हा गुजरात येथील पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याने वाहन शिरपूर शहरात असल्याच्या संशयावरून पोलिसांची मदत घेतली जात होती.
आज दि.०२/०८/२०२४ रोजी पोलीस नियंत्रण कक्ष, धुळे येथुन माहिती कळविण्यात आली की, गुजरात राज्यात चोरी केलेले डंपर वाहन क्र.जी.जे.१६/डब्ल्यु. १९१९ सह आरोपी धुळ्याचे दिशेने येत आहे.
त्यानुसार शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील यांनी तपासचक्रे वेगाने फिरवुन पोलीस अधिकारी व शोध पथकाचे अंमलदारांना वरील प्रमाणे ढंपर वाहनाचा व त्यावरील आरोपीतांचा शोध घेणेबाबत आदेशित केल्या नुसार मांडळ गेट जवळ ता. शिरपूर जि. धुळे येथे शहादा-चोपडा रोडवर डंपर वाहन क्र.जी.जे.१६/डब्ल्यु.१९९९ सह आरोपी नामे-१) शोएब शेख मुनाफ वय २८ व २) शाहरूख शेख मुनाफ वय २१ दोन्ही रा.पुर्व हुडको, चाळीसगाव रोड, धुळे यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांना सखोल विचारपूस करता त्यांनी सदरचे वाहन हे खरची गाव ता. झगडीया जि. भरूच राज्य-गुजरात येथुन चोरून आणले असल्याची कबुली दिल्याने त्याबाबत आम्ही माहिती घेतली असता सदर वाहन चोरी बाबत झगडीया पो.स्टे. जि.भरूच राज्-गुजरात येथे चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे समजुन आले आहे.
वरील इसमांना सखोल विचारपूस करता त्यांनी यापुर्वी देखील वटारीया गाव ता. वालिया जि. भरूच राज्य- गुजरात येथुन ढंपर वाहन क्र.जी.जे.०६/झेड-५९०० असे वाहन चोरी केल्याची कबुली दिली. त्याबाबत माहिती घेतली असता वालिया पो.स्टे. जि.भरूच राज्य-गुजरात येथे वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे समजुन आले आहे.
यावरून वरील इसम हे डंपर वाहन चोरी करणारे सराईत गुन्हेगार असुन त्यांनी चोरी केलेले ढंपर वाहनासह त्यांना ताब्यात घेवुन त्यांनी सदरचे वाहन तसेच यापुर्वी चोरी केलेले डंपर वाहन असे ०२ ढंपर वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात शिरपूर शहर पोलीसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भागवत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील, पोउनि/संदिप दरवडे, डी.बी. पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील, पोना/रविंद्र आखडमल, पोकों/विवेकानंदन जाधव, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, उमेश पवार, आरीफ तडवी, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटु साळुंके, सचिन वाघ व मनोज महाजन तसेच होमगार्ड मिथुन पवार अशांनी मिळून
