कोलकता येथील महिला डॉक्टरावरील घटनेचा निषेधार्थ डॉक्टर क्लब शिरपूर यांचे निवेदन व निषेध
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील डॉक्टरांची संघटना डॉक्टर्स क्लब यांच्यामार्फत कोलकत्ता येथील महिला डॉक्टर वरील झालेल्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला असून शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
यात नमूद करण्यात आले आहे की डॉक्टर्स क्लब, शिरपूर ही शिरपूर तालुक्यातील सर्व समावेशक व प्रतिष्ठित अशी संघटना आहे. आमच्या क्लबमध्ये ३०० पेक्षा अधिक डॉक्टर सदस्य आहेत, जे विविध वैद्यकीय शाखांमध्ये कार्यरत आहेत आणि आपल्या सेवांदद्वारे समाजाच्या आरोग्याची काळजी घेत आहेत्. ही संघटना नियमितपणे शिरपूर आणि आसपासच्या भागातील आरोग्य शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे यांसारखे उपक्रम राबवते.
आम्ही या संघटनेच्या वतीने कोलकता येथे एका महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवतो. या घटनेमुळे केवळ डॉक्टरांमध्येच नव्हे, तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस डॉक्टरांवर वाढत चाललेल्या हल्ल्यांमुळे आमच्यात अस्वस्थता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर, आम्ही आपणास विनंती करतो की शिरपूर परिसरातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आपली मदत व ठोस आश्वासन द्यावे. आणि आमच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवून कोलकत्ता येथील घटनेतील दोषींना कठोर कारवाई करण्यासाठी मागणी करण्यात यावी.
आम्हाला विश्वास आहे की आपण या गंभीर विषयावर त्वरित कारवाई कराल आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलाल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
डॉक्टर्स क्लब ने दिलेल्या या निवेदनावर तालुका भरातील डॉक्टरांनी आपल्या स्वाक्षरी केल्या आहेत.
