युवा पत्रकार हर्षल भदाणे-पाटील यांना व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघकडून सामूहिक श्रद्धांजली
शिरपूर - पत्रकारिता क्षेत्रातील युवा पत्रकार हर्षल भदाने यांचा धुळे येथे भीषण अपघाती मृत्यू झाल्याने शिरपूर शहरात व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना व शहरातील विविध पत्रकार संघटनातर्फे 31 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन लागत प्रगती आर्टस् कार्यालय व व्हॉईस ऑफ मीडियाच्या संपर्क कार्यालयबाहेर कँडल लावून प्रतिमा पूजन करीत श्रद्धांजली अर्पण करण्यात. आली.
धुळे शहरात एका ट्रक चालकाने चार चाकी वाहनाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला त्यात धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आणि मुंबईत कार्यरत असलेले तरुण पत्रकार हर्षल भदाणे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.पत्रकार हर्षल भदाणे याच्या अपघाती निधनाने पत्रकार क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाल्याने शिरपूर शहरातील पत्रकार संघटनेतर्फे कँडल लावून प्रतिमा पूजन करीत श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी शहरातील पत्रकार बांधव, प्रताप सरदार, राजेंद्र पाटील, सचिन पाटील, प्रशांत चौधरी, भिका चव्हाण, संजय पाटील, महेंद्र जाधव, गोपाल लक्ष्मण, गणेश पाटील, गणेश जैन,भूषण धाकड़, शिवाजी थोरात, लक्ष्मण बडगुजर,
इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.
