*संकल्प ग्रुप शहादा तर्फे न .पा.शाळेत चित्रकला साहित्य वाटप*
संकल्प ग्रुप गरीब आणि गरजू वर्गा साठी कार्य करीत असतो,आणि जेथे कमी तेथे आम्ही लक्षात घेता विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव मिळावा आणि आणि त्यांच्यातला कलाकार जिवंत रहावा यासाठी नगरपालिका शाळा क्रमांक 11 येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला वही, रंग खडू, स्टेशनरी आणि खाऊ विद्यार्थ्यांन पर्यंत पोहोचवली,
सदर उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ श्री अजयजी शर्मा तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री चंदूकाका शहा हे होते, मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच संकल्प ग्रुपचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या, सदर उपक्रमासाठी, शाळा क्रमांक 11 चा स्टाफ व संकल्प ग्रुपच्या सदस्य राकेश जैन , पिनाकिन पटेल , राकेश कोचर, रोहित अहिरे, पंकज पवार, बिपिन चव्हाण, जितेंद्र ललवाणी, संदीप बेलदार , प्रशांत कदम यांनी मेहनत घेतली आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून ग्रुप मेंबरला आनंद झाला.
