मा.उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वृक्षारोपण व रुग्णांना फळ वाटप*
शिरपुर ता.शिरपुर जि.धुळे दिनांक 22 जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने शिरपूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.पावरा यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच शिरपूर तहसील कार्यालयाच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी शिरपूर तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पाटील,शहराध्यक्ष हिराभाऊ कोळी (वाकडे) अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव वाजिदभाई शेख,युवक तालुकाध्यक्ष कुबेरसिंग जमादार,जिल्हा उपाध्यक्ष निलेशभाऊ गरुड, तालुका उपाध्यक्ष सुधिर चव्हाण,शुभम राजपूत ,शांतीलाल कोळी,जिल्हा संघटक आश्विनकुमार (शंभू) खैरनार, युवक तालुका उपाध्यक्ष भूषण भदाणे युवक तालुका प्रसिद्धी प्रमुख गौरव वाघ , तालुका ओबीसी सेल कार्याध्यक्ष राजेंद्र बोरसे, सिध्दार्थ वाघ,तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
