आगामी विधानसभा निवडणुकीत किसान सभेच्या महायुती सरकारला विरोध कायम
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय
मुंबई प्रतिनिधी - दिनांक 20/07/2024रोजी
संयुक्त किसान मोर्चाची मिटींग भुपेश गुप्ता भुवन मुंबई येथे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष काॅम्रेड राजन क्षीरसागर यांचा अध्यक्षेते खाली घेण्यात आली.
संयुक्त किसान मोर्चा दिल्ली येथिल रिपोर्टिंग डाॅ काॅ अशोक ढवळे यानी सविस्तर पणे सादर केले.
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधान सभा निवडणुकीत संयुक्त किसान मोर्चाची भुमिका युती सरकारचा विरोधात राहील असे सर्वानु मते ठरले.
दिनांक 8/08/2024रोजी तालुका जिल्हा पातळीवर संयुक्त किसान मोर्चाचा मागण्याचे निवेदन देण्याचे ठरले.महाराष्टातील महाविकास आघाडीचे खासदार याना देखिल निवेदन देण्यासाठी.प्रतिभाताई व उल्का महाजन याच्यावर भेटीचा संदर्भात जबाबदारी सोपविण्यात आली.
नाशिक येथे संयुक्त किसान मोर्चाचा 200कार्यकर्त्याचे शिबीर घेण्याचे नियोजन ऑगस्ट महीन्यात करण्याचे ठरले.
विभागीय परिषदा घेतल्या जातील.
संयुक्त किसान मोर्चा मागण्या साठी पाठपूरावा करण्यासाठी पंतप्रधान,विरोधी पक्ष नेते राहुल गांधी याच्या भेटी घैण्याचे ठरविण्यात आले
जेणे करुन संयुक्त किसान मोर्चाचा मागण्यांबाबत विचार विनिमय संसदेत देखील झाला पाहिजे.
सदर बैठकीसाठी सदर बैठकीसाठीअखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.काॅ अशोक ढवळे ,प्रदेशाध्यक्ष उन्मेश देशमुख,
महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अँड काॅ हिरालाल परदेशी,किसान सभेचे राज्य कार्यकारणी सदस्य काॅ आत्माराम भिसे,सत्यशोधक शेतकरी सभेचे काॅ किशोर ढमाले,आर.टी .गावीत,राष्ट्रीय किसान मंचचे मेघाताई पाटकर,लोक संघर्ष मोर्चाचा नेत्या प्रतिभाताई शिंदे,सर्व हरा जनांदोलनाचा नेत्या उल्काताई महाजन,कष्टकरी संघटनेचे नेते ब्रायन लोंबो,जन आदोंलनाचे संजय गोपाळ उपस्थित होते.मिटींग यशस्वी पार पडली.
काॅम्रेड राजन क्षीरसागर याची नुकीतीच अखिल भारतीय किसान सभेचा राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्व नेत्यांनी अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
ठरलेले निर्णय एकजुटीने करण्याचा संकल्प अँड हिरालाल परदेशीप्रदेशाध्यक्ष = महाराष्ट्र राज्य किसान सभा. यांनी केला.
