शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर शिवसेने कडून रक्तदान
शिरपूर प्रतिनिधी - शिवसेना पक्षप्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर शिवसेना यांच्यावतीने शिरपूर तालुक्यातील नागेश्वर बंगला (चौकी) येथे भव्य रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तरुणांनी प्रचंड संख्येने रक्तदान करून उद्धव साहेबांचा वाढदिवस सामाजिक वारसा जपत साजरा केला. या शिबिराचे आयोजन शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जितेंद्र राठोड यांनी केले होते, चेतन जाधव विभाग प्रमुख युवासेना, राहुल पाटील उपविभाग प्रमुख युवासेना, शिव राठोड उपशाखाप्रमुख यांचे सहकार्य लाभले. रक्तदात्यांना जितेंद्र राठोड यांच्याकडून हेडफोन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, उपजिल्हा संघटक राजु टेलर , उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा, तालुका प्रमुख युवराज पाटील, शहर प्रमुख अनिकेत बोरसे, उपतालुका प्रमुख शरद पाटील, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, युवा सेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी मयुर पाटील, उपशहर अध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक सेनेचे वाजिद मलक, विभाग प्रमुख युवासेना विशाल कोळी, किशोर बंजारा, जयराम बेलदार आधी नागरिक उपस्थित होते.
