बोराडी येथील एटीएम चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात शिरपूर तालुका पोलिसांनी केला गुन्हा उघड




बोराडी येथील एटीएम चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरपूर तालुका पोलिसांनी केला गुन्हा उघड 

शिरपूर प्रतिनिधी -  धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोराडी गावात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केबिनच्या बाहेर ओढून चोरून नेण्याचा प्रयत्न झाला होता. सदर गुन्हेच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलिसांनी मोठ्या शेतातील तपास करून चोरट्यांचा शोध घेतला व सदर गुन्हा उघडकीस आणला आहे.

दि.19/07/2024 रोजी रात्री 2.30 वाजेच्या सुमारास बोराडी गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम पाच अज्ञात चोरट्यांनी क्रूझर गाडीला रस्सी बांधून एटीएम मशीन केबिनच्या बाहेर ओढून चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी घरमालक व इतर लोकांनी एटीएम मशीन चोरत असल्याचे पाहून आरडाओरड केल्याने चोरटे ATM मशीन सोडून पळून गेले होते. त्याबाबत इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्विसेस चे मॅनेजर श्री प्रवीण सुधाकर पाठक यांच्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 305(a), 324(4), 62 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सदर गुन्ह्याचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या व गोपनीय माहिती काढून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या टीम करून तयार करून शिरपूर तालुका व महाराष्ट्र - मध्य प्रदेश सीमावर्ती भागात आरोपींचा शोध घेत असताना गुन्ह्यात वापरलेली CCTV फुटेज मध्ये दिसत असलेली क्रुझर गाडी हिचे वर्णनाशी मिळतेजुळते वर्णन असलेली एक गाडी खंबाळे या गावी असल्याची गोपनीय माहिती बीटचे अंमलदार ASI कैलास जाधव व PC मनोज नेरकर यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या आदेशावरून सदरचे गाडी मालक मगन पवार यांना गाडीसह पोलीस स्टेशनला विचारपूस कमी आणले असता त्यांने मी रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत धुळे किंवा जळगाव येथील रेल्वे स्टेशनला रेल्वे वॅगन वरील गोणी उतरवण्याकरीता माझे क्रूझर गाडीत मजुर घेऊन जात असतो असे सांगितले. तसेच माझा मुलगा योगेश हा कधीतरी गाडी वापरतो असे सांगितल्यानंतर योगेश यास पोलीस स्टेशनला आणून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व सांगीतले की, मला माझा मित्र अनिल याने आपल्याला ऊसतोडीसाठी मजूर शोधत आलेल्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करायची आहे, तू गाडी घेऊन हाडाखेड येथे ये असे फोन करून सांगितले, त्यावरून मी माझ्या दोन मित्रांना घेऊन हाडाखेड येथे आलो असता अनिलने अजून दोन मुलांना माझ्या गाडीत बसून घेतले त्यानंतर आम्ही लौकी मार्गे बोराडी येथे गेलो, तेथे आम्ही SBI बँकेचे ATM माझ्या क्रुझर गाडीच्या साह्याने दोर लावून कॅबिन मधुन खाली ओढले व उचलून नेण्याचा प्रयत्न केला परंतू गावातील काही लोकांनी आम्हाला पाहिल्याने आम्ही तेथून पळ काढला अशी कबुली दिली. त्यावरून आतापर्यंत गुन्ह्यात सहभागी असलेल्या सहा आरोपींपैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींची ओळख परेड बाकी असल्याने त्यांना बुरखा घालून न्यायालयात हजर केले असता यातील दोन आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड व एका आरोपीची तब्येत बरी नसल्याने त्याची मॅजेस्टेट कस्टडी रिमांड मिळाली आहे.

सदर गुन्ह्यात मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे सो, अपर पोलिस अधीक्षक श्री. किशोर काळे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भागवत सोनवणे सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ असई कैलास जाधव पोहेकॉ/संतोष पाटील, पोहेकाँ/ राजु ढिसले, पोहेकों / संदिप ठाकरे, पोहेकॉ/ अनिल चौधरी, पोकॉ/संजय भोई, पोकॉ/ योगेश मोरे, पोकों /  मनोज नेरकर, पोकों/ भुषण पाटील, पोकॉ/स्वप्निल बांगर, चापोकॉ/ सागर कासार अशांनी कामगिरी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने