धुळे जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत ढिवरे यांना धुळे भाजपा अनु. जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विक्रम तायडे, भाजपा अनु. जाती मोर्चा प्रदेश चिटणीस महेंद्र खैरनार, धुळे भाजपा अनु. जाती मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, आरपीआय युवक प्रदेश सचिव नरेश गवळे हे निवेदन देतांना
*साक्रीत दलित बांधवांवर मुस्लिम जमावाकडुन हल्ला हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी जिल्हा पोलिस अधिक्षक यांचाकडे भाजपा अनु. जाती मोर्चाची मागणी*
धुळे : साक्रीत आंबेडकर चौकत दलित समाजबांधवांची वस्तीवर दि. ११ जुलै २०२४ रोजी मुस्लिम जमावाने दगडफेक करुन दलित समाजबांधवांना मुस्लिम जमावाने तलवार, कोयता, चाकू लाठ्याकाठ्यांचा सर्रास वापर करत हल्ला चढवला. या दंगलीत समाजबांधव जखमी झाले आहेत. याप्रकरणी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी. यासाठी धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टी अनुसुचित मोर्चाच्या वतीने (दि.१५ जुलै) रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक यांचाकडे निवेदन देवुन केली आहे. निवेदन धुळे भाजपा अनु. जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विक्रम तायडे, भाजपा अनु. जाती मोर्चा प्रदेश चिटणीस महेंद्र खैरनार, धुळे भाजपा अनु. जाती मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, आरपीआय युवक प्रदेश सचिव नरेश गवळे यांचा शिष्टमंडळाने धुळे जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत ढिवरे यांची भेट घेवुन निवेदन देवुन मागणी केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, याआधी दि. १४ एप्रिल २०२४ रोजी जिल्ह्यातील दोंडाईचा येथे मशीद समोरुन जाताना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीवर सुद्धा दगडफेक झाली होती. त्यामध्ये अनेक महिला, पुरुष जखमी झाले होते. त्यामुळे मुस्लिम समाजाकडुन दलित समाजावर दगडफेक होण्याची धुळे जिल्ह्यातील ही दुसरी गंभीर घटना आहे. तरी या प्रकरणातील मुळ आरोपीला पकडुन कडक कारवाई करण्यात यावी. व दगडफेक घटना झाल्यानंतर पोलिसांनी अन्याय करणाऱ्यांना मोकाट सोडले असून निर्दोष लोकांना मात्र कोठडीत डांबले आहे. या वादाला ज्यांनी सुरुवात केली आहे ते आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे. या उलट घटनास्थळी उपस्थित नसलेले दलित समाजबांधवांवर खोटा गुन्ह्यात गोवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांना कोठडीत डांबून अन्याय सहन करावा लागत आहे. सदर भांडणातील मास्टरमाइंड आरिफ शेख, जाकीर शेख हे मात्र पोलिसांसमोर मोकाट फिरत आहेत. जगदीश वाघ व कपिल वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीमधील एकही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेला नाही. उलट मुख्य आरोपीने सूडबुद्धीने निर्दोष लोकांची नावे टाकली असून पोलिसांनी शहानिशा न करता अटक केली आहे. यावरून पोलीस एका विशिष्ट धर्मातील लोकांना मदत करत असल्याचे दिसत आहे. तरी निर्दोष लोकांवर गुन्हे मागे घेऊन संबंधित आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना जेरबंद करावे, अन्यथा धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टी, अनुसुचित जाती मोर्चा तर्फे तीव्र आंदोलन केले जाईल असा ईशारा हि देण्यात आला आहे. धुळे जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत ढिवरे यांची धुळे भाजपा अनु. जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विक्रम तायडे, भाजपा अनु. जाती मोर्चा प्रदेश चिटणीस महेंद्र खैरनार, धुळे भाजपा अनु. जाती मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, आरपीआय युवक प्रदेश सचिव नरेश गवळे यांचा शिष्टमंडळाने भेट घेवुन चर्चा करुन निवेदन दिले आहे.
