मंदाना (शहादा) येथे मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन....




मंदाना (शहादा) येथे मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन....

शहादा प्रतिनिधी 

मंदाना (शहादा) येथे मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन....


आज दि.15 जुलै 2024 रोजी मौजे मंदाना येथे कृषि विभाग मार्फत मका पिकाचे उत्पादन वाढीकरिता एकात्मिक व्यस्थापन बाबत मार्गदर्शन करण्यात आले. श्री.एकनाथ सावळे कृषि पर्यवेक्षक यांनी मका पिकावरील लष्करी अळीचे जीवनक्रम त्यात अंडी, अळी, कोष व पतंग या अवस्थेत कोणत्या अवस्थेत पिकाचे नुकसान होते त्याबाबत माहिती देण्यात आली.त्यात थायमेथोक्झाम 12.6% + लामडा सायलोथ्रीन9.5% , इमामेक्टिन  बेंझोइट 5% , क्लोरांट्रानीलीप्रोल 18.5% या सारखे रासायनिक घटक असलेले औषधाची फवारणी करण्याचे आवाहन केले . मका पिकाचे एकात्मिक खत व्यवस्थापन मध्ये सरळखत, संयुक्तखत, झिंक सल्फेट, नॅनो युरिया, नॅनो डीएपी बाबत माहिती देण्यात आली.
तसेच श्री.कल्याण पवार कृषि सहाय्यक यांनी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे सर्व खातेदारांनी मुदतीत विमा उतरवला पाहिजे जेणकरून नैसर्गिक आपत्तीत जसे अतिवृष्टी, गारपीट, पावसाचा खंड, वादळ, चक्रीवादळे, कीड व रोगाचा व्यापक प्रादुर्भाव पासून होणारे नुकसानीस संरक्षण करता येईल . त्याच प्रमाणे कृषि विभागाच्या विविध योजना त्यात कृषि यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, गोपीनाथ मुंडे अपघात योजना, पिएम किसान योजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रम मंडळ कृषि अधिकारी श्री. मनोज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून  गावाचे सरपंच श्री.पंडित आप्पा भील ,उपसरपंच श्री. शरद साळुंखे, प्रगतशील शेतकरी श्री. विनोदभाई पटेल, प्रमोद मोरे, यशवंत पाटील  व परिसरातील शेतकरी उपस्थीत होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने