शिरपूर फर्स्टचे नंदुरबार लोकसभा खासदार ऍड. गोवाल पाडवी यांना टोल संबंधित निवेदन..




शिरपूर फर्स्टचे नंदुरबार लोकसभा खासदार ऍड. गोवाल पाडवी यांना टोल संबंधित निवेदन..

शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर सोनगीर आणि अधिकृत वसुली विरोधात संघर्ष सुरू आहे. शिरपूर नगरपालिकेच्या हद्दीपासून चार किलोमीटरच्या अंतरावर असलेले शिरपूर टोल शिरपूरच्या स्थानिक वाहनधारकांसाठी आधार कार्ड दाखवून टोल माफ करा. व शिरपूर सोनगीर या टोल मधील अंतर केवळ 32 किलोमीटर आहे. जर दोन टोल मधील अंतर हे किमान 60 किलोमीटर पाहिजे तर शिरपूर व सोनगीर टोल मधील अंतर हे फक्त 32 किलोमीटर कसे.
शिरपूर ते धुळे या पन्नास किलोमीटर अंतरासाठी 
वाहनधारकांना एकूण जाण्यासाठी 205 रुपये टोल भरावा लागतो. ही वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक आहे शिरपूर सारख्या ग्रामीण भागातून येणारा वाहनधारक या वसुलीच्या सातत्याने बळी पडत आहे.
यासाठी शिरपूर फर्स्टने शिरपूर तहसीलदार, प्रांताधिकारी, आमदार, धुळे NHAIचे डायरेक्टर, स्थानिक टोल प्रशासन यांना निवेदन दिले आहे.
स्थानिक टोल प्रशासन व धुळे NHAI यांच्या कडून उडवाउडवीची उत्तर आले आहे, वारंवार चुकीची माहिती टोल प्रशासन व NHAI धुळे देत आहे. याविरोधात शिरपूर फर्स्टने अनेक वेळा आंदोलन, उपक्रम राबविण्यात येत आहे.
नंदुरबार लोकसभा खासदार ऍड गोवाल पाडवी यांनी हा विषय लोकसभेत मांडावा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पर्यंत विषय पोहचवून जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी शिरपूर फर्स्टची मागणी आहे.
शिरपूर टोल स्थानिकांना माफ करावा, सोनगीर टोल हा अनधिकृत आहे हा बंद करावा व गैरवर्तवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी असे निवेदन आज शिरपूर फर्स्टच्या वतीने करण्यात आले.
यावेळी शिरपूर फर्स्टचे पंकज मराठे, कल्पेश राजपूत, पार्थ राजपूत, पुष्पक जैन, हंसराज चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने