सात लाखांची रोकड आणि सोने चोरी करणाऱ्या चोरास शिरपूर तालुका पोलीस ठाण्याकडून अटक




सात लाखांची रोकड आणि सोने चोरी करणाऱ्या चोरास शिरपूर तालुका पोलीस ठाण्याकडून  अटक 

शिरपूर -  शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शीताफिने अटक करून चोरीच्या गुन्हा उघडकीस आणला आहे.

शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार श्री दौलत हिरालाल राठोड वय-३८ व्यवसाय-किराणा दुकान रा.शेमल्या ता.शिरपुर जि. धुळे हे दिनांक ०७/०७/२०२४ रोजी दुपारी ०१/०० वा. चे सुमारास त्यांचे मुलांचे शाळेचे साहीत्य घेण्यासाठी सेंधवा येथे गेले होते. सायंकाळी ०५/०० वाजेचे सुमारास ते घरी परत आले त्यावेळी त्यांचे घराचे मिंतीच्या विटा विस्कटुन आत प्रवेश करुन घरातील कपाटाचे दार व कपाटाची तिजोरी उचकटुन तिजोरीत ठेवलेले ७,२०,०००/- रोख रक्कम व ४५,०००/- रु किंमतीचे सोन्याचे दागीने चोरी झाले होते. याबावत त्यांनी प्रथम गावात विचारपुस व शोधाशोध केली. 

त्यानंतर शिरपुर तालुका पोलीस ठाणे येथे चोरीबाबत तक्रार दिली होती. त्यावरुन शिरपुर तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १९१/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३०५, ३३१ प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत होते. गुन्हा दाखल होत असतांनाच तक्रारदार यांचे कडील चोरी बाबत मिळालेल्या माहीत वरुन पोनि/जयपाल हिरे यांनी दोन पथके तयार करुन संशयीत आरोपीचा परिसरात शोध घेणे सुरु केले होते दरम्यान मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारावर इसम नामे मुकेश शिलदार पावरा वय-२८ रा.शेमल्या ता. शिरपुर जि. धुळे यास दि.09/07/2024 रोजी अटक करुन न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळाला होता. त्यादरम्यान त्याने गुन्हयाची कबुली दिली होती. त्याने खालील प्रमाणे चोरीस गेलेला माल काढुन दिला.

हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल

१) ७,०४,६००/- रुपयेची रोख रक्कम

२) ४५,०००/- रुपये किंमतीची ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने

एकुण- ७,४९,०००/-

सदर कारवाई श्री श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे, श्री किशोर काळे अपर पोलीस अधिक्षक धुळे, श्री भागवत सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उप निरीक्षक कृष्णा पाटील, पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब वाघ, असई रफिक मुल्ला, पोहेकों सुनिल पाठक, पोहेकों  संतोष पाटील, पोहेका राजु ढिसले, पोहेको  खसावद, पोहेकॉ/ संदिप ठाकरे, पोकॉ/ भुषण पाटील, पोकॉ/ योगेश मोरे, पोकॉ/ स्वप्नील बांगर, पोकॉ/ संजय भोई, पोकॉ/पावरा, पोकॉ/ दिनकर पवार, पोकॉ/ सुनिल पवार, चापोकॉ/सागर कासार यांनी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने