दंगलीच्याच गुन्हयातील
दहा वर्षांपासून फरार आरोपीला शहर पोलिसांकडून अटक
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथील दाखल दंगलीच्या पुण्यातील व गंभीरज दुखापत करण्याच्या गुन्ह्यातील दहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने अटक केली आहे.
शिरपुर शहर पो.स्टे.चे पो.नि.के. के. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरपुर शहर पो.स्टे. गुरनं. २१५/२०१४ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील १० वर्षापासून फरार असलेला आरोपी नामे सुनिल उर्फ सुन्या सुरशा भिल वय २९ रा. सुंदरवाडी वरवाडे शिरपुर जि.धुळे हा कळमसरे ता. शिरपुर जि.धुळे गावात आलेला असल्यावायत मिळालेल्या गोपणीय बातमीवरुन शोध पथकाचे अंमलदारांनी कळमसरे ता. शिरपुर जि. धुळे गावात जावुन सापळा लावून सदर फरार आरोपीतास शिताफीने ताब्यात घेवुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
वरनमुद फरार आरोपीताने दि.०४/१०/२०१४ रोजी २०.०० वाजेचे सुमारास तक्रारदार-श्री-हिरशा बाबु भिल रा.सुंदरवाडी वरवाडे शिरपुर जि. धुळे हा पोलीस स्टेशनला तक्रार करतो या कारणावरुन त्याने व त्याचे सोवतचे इतर आरोपीतांनी सामाईक इरादयाने दंगल करुन तक्रारदार व साक्षीदार यांना काठीने डोक्यावर मारुन गंभीर दुखापत करुन शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल असुन तो सदर गुन्हयात तब्बल १० वर्षापासुन फरार होता.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. भागवत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील, तसेच शोध पथकाचे पोहेकों/ललित पाटील, पोहेकों/गंगाधर सोनवणे पोना/रविंद्र आखडमल, पोकों/विनोद अखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, भटु साळुंके, प्रशांत पवार, मनोज महाजन, आरीफ तडवी, मनोज दाभाडे, सचिन वाघ अशांनी मिळुन केली आहे.