अभिनंदनाच्या वर्षावाने आभाळ झाले ठेंगणे, कुमारी क्रिष्णा महेशकुमार सिसोदिया विज्ञान शाखेत सर्व प्रथम.
वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकर
दोंडाईचा दि.२२ मे- शिरपुर येथील पी. बी. एम. म्युनिसीपल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी कुमारी क्रिष्णा महेशकुमार सिसोदिया ही फेब्रुवारी/मार्च २०२४ दरम्यान झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेत विज्ञान शाखेत ८६% गुण मिळवून सर्व प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाली. सदर विद्यार्थीनीला गणित, रसायणशास्र आणि जीवशास्र या विषयांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त झाले आहे.
कुमारी क्रिष्णा सिसोदिया ही मुळ शिरपूर तालूक्यातील होळनांथे येथील रहिवाशी आणि दोंडाईचा येथील स्टार्च फॅक्टरीतील बॉयलर इंजिनीयर श्रीमान महेशकुमार सुरेंद्र सिसोदिया यांची सुकन्या असून तिच्या अभिनंदनिय यशाचे श्रेय तिच्या शिक्षक वर्गाला आणि तिची आई प्राथमिक शिक्षीका सौ. निलीमा, वडील श्रीमान महेशकुमार सिसोदिया, आजी सौ. शकुंतला, आजोबा प्राचार्य डॉ. सुरेंद्र गिरासे यांना मिळालेल्या यशाचे कुमारी क्रिष्णा सिसोदिया हिने श्रेय दिले आहे. सदर विद्यार्थीनीने भविष्यात वैद्यकिय शाखेच्या अभ्यास क्रमाला प्रवेश घ्यावयाचा मनोदय व्यक्त केला आहे.
कुमारी क्रिष्णा सिसोदिया हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दोंडाईचा संस्थानचे अधिपती श्रीमंत सरकारसाहेब रावल, पत्रकार धनंजय गाळणकर, दोडाईचा व्यापारी संघाचे अध्यक्ष के.एम. अग्रवाल, स्वोद्धारक शिक्षण संस्थेचे सचिव श्रीमान सी. एन. राजपूत, उद्योजक सुनिल पुरसवाणी, उजाला झेरॉक्सचे संचालक राजेंद्रसिंह सिसोदिया, अपंग संघाचे नेते हुसेनभाई विरदेलवाले, जेष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष सुरेश निंबाजी चौधरी, श्रीमंत सरकारसाहेब रावल यांचे स्विय साहाय्यक चेतन राजपूत आदींनी कुमारी क्रिष्णा सिसोदिया हीचे मिळालेल्या यशा बद्दल कौतुक करत हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
