महाराष्ट्राच्या व मध्य प्रदेशाच्या सीमेवर वाहनांची कसून चौकशी,* शहादा प्रतिनिधी सुमित गिरासे




*महाराष्ट्राच्या व मध्य प्रदेशाच्या सीमेवर वाहनांची कसून चौकशी,*


 शहादा प्रतिनिधी सुमित गिरासे 

 नंदुरबार जिल्ह्यात सध्या निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले असल्याकारणाने नंदुरबार जिल्ह्यातील मध्य प्रदेश व गुजरात सिमेवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची पोलीस प्रशासनामार्फत कसून चौकशी  करण्यात येत असल्याचे समजते, याबाबत अधिक माहिती अशी की सध्या लोकसभा निवडणुकीची धूम धाम सुरू  झाली आहे या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील ठिकठिकाणी म्हणजेच सीमेवरती नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत गेल्या महिन्याभरापासून ठिकठिकाणी पोलीस चौकी बसवण्यात आली असून मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या दिशेने येणारे प्रत्येक वाहनांची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे, यात भमराठा नाका, शहाणा चेक पोस्ट, बोरद गावाजवळ, हिंगणी गावाजवळ, प्रकाशा, सारंगखेडा, आधी ठिकाणी नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे , रात्री व रात्री देखील पोलीस कर्मचारी येथे दिसून आले आहे, नंदुरबार जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याकारणाने राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून शहादा तालुक्याची ओळख आहे राजकारणाचे सर्वच राजकीय खेडी ही नंदुरबार जिल्ह्यातूनच खेळले जाते हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पोलीस विभागाने जवळपास सर्वच ठिकाणी प्रत्येक वाहनाला थांबून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने