नंदुरबार (अ.ज.) लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे अनुषंगाने द्वितीय प्रशिक्षण संपन्न




नंदुरबार (अ.ज.) लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे अनुषंगाने  द्वितीय प्रशिक्षण संपन्न

शिरपूर प्रतिनिधी -
दि.०७-०५-२०२४ रोजी  शिरपूर तालुक्यातील ३३३ मतदान केंद्रा वरील नियुक्ती करण्यात येणाऱ्या मतदान कर्मचारी यांचेसाठी आर.सी.पटेल मुख्य ईमारत शिरपूर येथे दिनांक १३-०५-२०२४ रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने व्दितीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते .सदर  प्रशिक्षणात केंद्रअध्यक्ष, इतर मतदान अधिकारी, असे एकूण 1110 कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले .



सदर प्रशिक्षणा मध्ये मतदान कर्मचारी यांच्या कर्तव्य व जबाबदारी तसेच मतदान केंद्रावर पोहचल्यावर करावयाची कामे ,मतदान यंत्र जोडणी, साहित्य जमा करतांना कोण कोणते आवश्यक कागद पत्रे जमा करावी या बाबत प्रशिक्षण देण्यात आले ,तसेच प्रत्येक्ष मतदान  यंत्र कसे हाताळावे या बाबत देखील सेक्टर अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी संबंधित मतदान कर्मचारी यांना माहिती दिली. 
तसेच 18 कर्मचारी याना गैरहजर असल्याने नोटिस देण्यात आलेल्या आहेत 



सदर प्रशिक्षण हे डॉ.शरद मंडलिक सहा.निवडणुक निर्णय अधिकारी शिरपूर व महेंद्र माळी तहसीलदार शिरपूर, यांचे मार्गदर्शना खाली करण्यात येऊन सदर ठिकाणी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, नायब तहसीलदार महेश साळुंखे, नायब तहसीलदार रवींद्र कुमावत, नायब तहसीलदार विजय पाटील, तालुका कृषी अधिकारी संजय पवार हे उपस्थितीत होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने