विद्यार्थ्याचे शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्राबाबतचे अर्ज सादर करण्याचे आवाहन




विद्यार्थ्याचे शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्राबाबतचे अर्ज सादर  करण्याचे आवाहन

शिरपूर - प्रतिनिधी
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी पशसंवर्धन, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश (सीईटी सेल) प्रक्रिये अंतर्गत विद्यार्थ्याचे शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गतील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.



त्याअनुषंगाने, जात वैधता प्रमाणपत्रा अभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी शासकीय (www.bartievalidity.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर जावून ऑनलाइन पध्दतीने आपला अर्ज भरून त्या सोबत आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोडक करुन त्याची एक हार्ड प्रत आवश्यक त्या कागदपत्रे/पुराव्याच्या साक्षांकित प्रतीसह दि.१५ जून, २०२४ पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी-विंग, दुसरा मजला, सिंचन भवनच्या मागे, साक्री रोड, धुळे या समिती कार्यालयाकडे सादर करावे. तसेच ज्या अर्जदार यांनी यापुर्वी समितीकडे अर्ज सादर केले आहेत त्यांनी आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी उपरोक्त संकेतस्थळावरील TRACK YOUR APPLICATION या टॅब वर आपला अर्ज नोंदणी क्रमांक नमूद करून आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्यावी. त्रुटीपुर्ततेसाठी दर बुधवार व गुरुवार रोजी (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) समिती समोर अर्जदार यांनी स्वतः हजर राहून त्रुटी पूर्तते विषयक कागदपत्रे तथा पुरावे सादर करावे.

जे मागासवर्गीय विद्यार्थी वरील मुदती नंतर उशिराने अर्ज सादर करतील किंवा ज्या अर्जदार यांनी विहीत मुदतीत कागदपत्रांची पूर्तता केली नाही. अशा अर्जदार यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास त्यास स्वतः अर्जदार विद्यार्थी हे व्यक्तीशः जबाबदार असतील याची नोंद घ्यावी.

असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे येथील समितीच्या अध्यक्षा गीताजंली बाविस्कर, उपायुक्त राकेश महाजन तसेच संशोधन अधिकारी संजय सैंदाणे यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने