*रोटरी इंग्लिश स्कूलचा 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा 100% निकाल*
दोडाईचा (अख्तर शाह)
दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलचा दहावी सीबीएसई (AISSE) बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात शाळेचा 100 टक्के निकाल लागला आहे.
परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या एकूण 57 विदयार्थ्यांपैकी 36 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, प्रथम श्रेणीत 14 विद्यार्थी, तर द्वितीय श्रेणीत 7 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
स्कूलमध्ये कु.वसुंधरा पाटील हिने 96.20 टक्के गुण मिळवून प्रथम,कु.तनुश्री जाधव हिने 95.40 टक्के गुण मिळवून द्वितीय,कु.स्वरा नगरदेवळेकर व स्वप्निलकुमार पाटील यांनी 93.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. याशिवाय कु.आश्लेषा कागणे, कु.धारा जैन, कु. भूमिका सोनवणे, यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळविले. विशेष बाब म्हणजे कु.वसुंधरा पाटील हिने सामाजिक शास्र विषयात, कु.तनुश्री जाधव हिने गणितात व कु. भूमिका सोनवणे हिने मराठीत 100 पैकी 100 गुण प्राप्त केलेत.
एकूण 7 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण,8 विद्यार्थ्यांनी 8O% पेक्षा अधिक गुण, 21 विद्यार्थ्यांनी 70% पेक्षा अधिक गुण,14 विद्यार्थ्यांनी 60% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले.
शाळेच्या गुणवत्ताधारक व उत्तीर्ण सर्व विदयार्थ्यांचे रोटरी स्कूलचे अध्यक्ष श्री हिमांशु शाह, उपाध्यक्ष श्री डॉ.मुकुंद सोहोनी, डॉ.राजेश टोणगांवकर, संचालक मंडळ,प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक, रोटरी परिवार ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
