ॲड. गोवाल पाडवी यांना शिरपूर मधून अभूतपूर्व प्रतिसाद!!
ॲड. गोवाल पाडवी विजयाचा आत्मविश्वास
शिरपूर प्रतिनिधी - नंदुरबार मतदार संघात भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी या दोन पक्षात लोकसभेसाठी लढत होत असून पूर्वाश्रमीच्या पारंपरिक मतदारसंघात आता पुन्हा काँग्रेसकडे लोकांच्या कल असून शिरपूर तालुक्यातील देखील मोठ्या मताधिक्याने मतदान प्राप्त होऊन आपण विजय प्राप्त करू आणि या तालुक्याची सेवा करू असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांनी व्यक्त केला आहे.
नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांनी शिरपूर येथे महाविकास आघाडीचा मेळावा तसेच दोन दिवशीय भेटीगाठी दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी शिरपूर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या एकजुटीचे दर्शन झाले आहे.
शिरपूर येथे बोलवण्यात आलेली बैठक ही गर्दीमुळे मेळाव्यात बदलल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला दिसून येत आहे. शिरपूर येथे ठिकठिकाणी लोकांकडून गोवाल पाडवी यांचे अभूतपूर्व असे स्वागत करण्यात आले. शिरपूरचा हा प्रतिसाद पाहता शिरपूर यंदा काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे दिसून येत आहे.
वाडी.खु, वाडी.बु, नादर्डे, न्यु बोराडी, जामनपाणी, सलाईपाडा, जुना धाबापाडा, नवा धाबापाडा, तिर्खिबर्डी, चिचपाणी, बुडकी, नवागाव, वाकपाडा, कोडीद, गदडदेव, मालकातर, बोरपाणी, फत्तेपूर, चागडू, वासर्डी, निमझरी, सामर्यापाडा, टेभेपाडा, बोराडी, खारीखान, चैदीपाडा, बुडकीविहीर, खा-यापाडा, डोडवाडा, झेंड्यांजन, वकवाड, दुरबड्या, मोहीदा, बाटवापाडा, शेमल्या, पडासनेर, हैदद्रपाडा, पानाखेड, सांगवी या आणि इतर अनेक गावात भेटी देऊन ॲड. गोवाल पाडवी यांनी अनेक तरुण, महिला जेष्ठ , कष्टकरी, कामगार, आदिवासी यांचे प्रश्न जाणून घेतले.
ॲड. गोवाल पाडवी यांची नम्रता त्यांचा संवेदनशील स्वभाव यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झालेली दिसून येत आहे. मागील निवडणुकीत शिरपूरमध्ये झालेली पीछेहाट यंदा भरून निघेल असा विश्वास आता काँग्रेसला निर्माण झाला आहे.
शिवाय काँग्रेस उमेदवार ॲड. गोवाल पाडवी हे तरुण सुशिक्षित उमेदवार असून आ.के.सी. पाडवी यांचे सुपुत्र असल्याने त्यांना मोठे राजकीय वलय असून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे भविष्यात युवकांच्या रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योग व्यवसाय, आर्थिक उन्नती, महिलांचे सक्षमीकरण, सर्वधर्मसमभाव, विकासाच्या ध्यास, शिक्षण इत्यादी प्रमुख गोष्टींवर आपण भर देणार असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात संधीचे सोने करणार आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.




