*जागर मधुन उतरले,'शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ 'लोकशाही संरक्षण आणि संवर्धन....*
*शिरपूर*:-
११एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाही उत्सवाचे औचित्य साधून खालचे गाव बौद्धवाडा येथे सत्यशोधक जनआंदोलन आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी कॉ.सिद्धार्थ जगदेव सेक्रेटरी सत्यशोधक जन आंदोलन महाराष्ट्र,कॉ.दत्ता थोरात उपाध्यक्ष सत्यशोधक जनआंदोलन महाराष्ट्र,के.के पाटील शिरपूर पोलिस निरीक्षक शिरपूर, जी.के मंगळे माजी उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब कुवर,माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी,माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे बी.के थोरात,आनंदा खैरनार,भाजपा अध्यात्मिक संघटना शहराध्यक्ष संतोष माळी, युवराज माळी,सुकलाल खैरनार,महादू गवळे, रोहीदास थोरात,केशव सावळे,आत्माराम मोरे, महेंद्रसिंग परदेशी,डॉ.बी.सी थुल,डॉ.नागोराव डोंगरे,माजी नगरसेवक गणेश सावळे,माजी नगरसेवक पिंटू शिरसाठ, विनायक वाघ,संदीप वाघ, क्रांती पवार,राजेंद्र सावळे, दिलीप मैराळे,जालिंदर थोरात, अशोक ढिवरे, बापूसाहेब इंदासे,प्रताप देवरे, बन्सिलाल शिरसाठ,दिलीप इंदासराव,
माजी नगरसेवक बाबुदादा खैरनार, राजू खैरनार, महेंद्र करंकाळ,अनिल आखाडे,रमेश वानखेडे,पत्रकार प्रताप सरदार,बापू थोरात,राजु गुजराथी,गोविंदा थोरात,
गौतम थोरात,माजी नगरसेवक सुरेश अहिरे, नरेशकुमार सोनवणे,अनिल महिरराव,प्रकाश ईशी, सुधीर ईशी, अनिल बाविस्कर,
रतिलाल भामरे, डॉ.नितीन निकम, डॉ.ब्रिजेश थोरात,ॲड.
आशिष अहिरे,ॲड जितेंद्र पवार,
ॲड.शालिनी सोनवणे,कल्पना उशी,ॲड.योगेश शिरसाठ
प्रा.अरुण पवार,सुनील बैसाणे,पनीराज बैसाणे,नितीन मंगळे,ज्ञानेश्वर निकम,विजयानंद शिरसाठ यांची विशेष उपस्थिती होती.सुरूवातीला महामानवांना माल्यार्पण विशेष उपस्थिती गण च्या हस्ते करण्यात आले.यावेळी मितेश वाल्हे तु बुद्धी दे,तु तेज दे ने...अभिवादन केले.नंतर 'पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे... समुह नृत्याचे सादरीकरणातून वातावरण मंत्रमुग्ध झाले.
तद्नंतर' जागर'२०२४ चे
हिराताई बाबुराव सावळे,इंदुबाई जगन थोरात,सिंधुबाई पुंडलिक माळी,सुशिलाबाई मुरलीधर पाटील,चंदनबाई तुकाराम वानखेडे,अनुबाई ओंकार वाघ
,मिनाबाई भिमसिंग परदेशी,रईसा इस्माईल तेली,आशाताई खंडू बैसाणे, शकुंतला पावरा व यांच्या हस्ते आकाशात बलून सोडून उद्घाटन करण्यात आले.महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांना समुहनृत्यातून सुरूवातीला अभिवादन करण्यात आले.त्यात
स्त्री शिक्षणाच्या चळवळीत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सोबत लहुजी साळवे यांनी दिलेल्या योगदानावरील ड्रामा प्लस समुह नृत्य गीत-लहुजी बोले ज्योतीला...सादर केले.तद्नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांना अभिवादन करताना,
'नव्हते घर नव्हते दार..हे गीत समुह नृत्याचे व
'माय मना भीमराव लाखो जनस्मा एक चे सादरीकरण झाले,या तिन्ही अभिवादन समुहनुत्य गिताचे नेहा रविंद्र माळी इयत्ता चौथीच्या विद्यार्थीनीने सुत्रसंचलन केले.पुढे प्रास्ताविकेत येत्या,'जागर'
या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला विराम देत, २६जुन२०२४ रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती दिनी 'डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला' सत्यशोधक शिक्षक सभेच्या वतीने पुन्हा नव्याने सुरूवात करण्याचे जाहीर सतिष खैरनार यांनी केले.
१८वर्षाचे साथी अल्टिमेट डान्स ग्रुपचे प्रशिक्षक विक्की आखाडे, महेंद्र रखमे,सोनु मोहिते,राकेश बोरसे, सुनील खैरनार,आर्यन पारवा,सागर ईशी रमेश झांजरे यांचे के.के पाटील व सत्यशोधक पदाधिकारी यांच्याकडून जाहीर सत्कार करण्यात आला.
जागर २०२४ च्या लोकशाही संरक्षण आणि संवर्धन वर आधारित थीमला ड्रामातून सादरीकरण झाले.याआधी शाहीर संतोष थोरात यांनी संविधान लाल किलेसे बोल रहा..या कवितेचे सादरीकरण झाले.तद्नंतर शिवराय व त्यांचे अष्टप्रधान मंडळ यांनी सध्या राज्यात व देशात काय सत्य परिस्थिती आहे याची माहिती शिवरायांच्या समोर अष्टप्रधान मंडळने सादर केले याच मंडळाला शेवटी महाराज लोकशाही संरक्षण आणि संवर्धन करीता जनतेला आवाहन करतात व आपला मतदान हक्क योग्य बजावला पाहिजे असे सांगतात. 'हाती घेऊन भगवा निळा ....या समुह नृत्य गितातून महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी सुत्रसंचलन राहुल थोरात यांनी केले.
शेतकरी हिताचे मयुरी महेंद्र करंकाळ ने सुत्रसंचलन केले.'ले करलो कदर किसान की..'या शेतकरी आंदोलनवर आधारित गीत सादर झाले. दर्शनी शामकांत शिरसाठ ने आदिवासी नायक व आदिवासी संस्कृती वर आधारित 'आमु आखा एकशे रे...जय जोहार जिंदाबाद नृत्याचे सुत्रसंचलन केले,व सादरीकरण झाले.पुढे
राष्ट्रीय एकात्मता वर आधारित ड्रामा व नृत्य 'माणूस मारला...चे सादरीकरण क्रांती पाणपाटील ने केले व सुत्रसंचलन प्रविण पाणपाटील यांनी केले.
राष्ट्रीय एकता व एकात्मता वर आधारित नृत्य 'हम सब साथ है.. चे सुत्रसंचलन निशाद देवानंद थोरात ने केले.विजय अहिरे यांनी संविधान गौरव गीत व 'द वार बीट' गीताचे सुत्रसंचलन केले व सादरीकरणात सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्वाला मोरे व प्रा.प्रज्ञावंत बि-हाडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवानंद थोरात, सुनील थोरात,प्रेमराज निकम,विनोद आगळे, प्रविण आगळे,अनिल खैरनार,आनंद निकम, सुनील सोनवणे,बाळा पवार,गौतम अहिरे,किरण अहिरे,भैय्या अहिरे, सिद्धार्थ बैसाणे,मनोज बि-हाडे,पंकज हिवाळे,आबा मोरे, कमलेश रणदिवे,हरीश मोरे,संदीप वानखेडे, दादाभाऊ पाटोळे,अजय ढिवरे,जय पवार,सौरव मोरे यांनी श्रम घेतले.
Tags
news
