मोदी पंतप्रधान असणे देशासाठी लाभदायक नाहीः ते तिसऱ्यांदा सत्तेत आले तर देशात दंगली भडकतील- प्रकाश आंबेडकर




मोदी पंतप्रधान असणे देशासाठी लाभदायक नाहीः ते तिसऱ्यांदा सत्तेत आले तर देशात दंगली भडकतील- प्रकाश आंबेडकर

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान देशासाठी लाभदायक नाही. ते मुख्यमंत्री होते तेव्हा गोध्रा हत्याकांड घडले. पंतप्रधान झाले तेव्हा मणिपूर जळले. आता पुन्हा पंतप्रधान झाल्यास संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर देशात अशांतता माजेल, दंगली भडकतील, संविधान बदलले जाईल हा संभाव्य धोका आपण लक्षात घेतला पाहिजे, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

मोदी सरकार शेतकरी विरोधी

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशातील किसान आजही दिल्लीत आपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत. मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमाल त्यांच्या शेतातच खरेदी करावा, असे मोदी सरकारचे धोरण आहे, याला विरोध म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरले असे म्हणत त्यांनी मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे म्हटले आहे. तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून आतापर्यंतची आकडेवारी पाहिली असता मोदींच्या कार्यकाळात देशावरील कर्ज कितीतरी पटीने वाढले, हे ताज्या आकडे वरून स्पष्ट झाले.

तर त्यांना आतंकवादी म्हणणार काय?

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेला एनआरसी, सीएए हा कायदा बेकायदेशीर असून अन्यायकारक आहे. मोदी सरकारला लोक कंटाळले आहेत. प्रत्येकाला परिवर्तन हवे आहे. कोणी उघडपणे बोलते तर कोणी बोलत नाही. तमाम जनता हे मोदीच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. हुकूमशाहीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल की नाही सांगता येत नाही. देशात अशी काही जमात आहे की, त्यांचा राहण्याचा ठाव ठिकाणा नसतो दोन वेळचे जेवण भेटलं तरी त्यांच्यासाठी खूप आहे अशा लोकांकडे जन्माचा दाखला नसेल तर त्यांना आतंकवादी म्हणणार काय?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने