हद्दपार इसम शिरपुर शहर पो.स्टे. हद्दीत फिरतांना शिरपूर शहर पोलिसांची कारवाई
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरातून हद्दपार असलेल्या विश्वास शहरात फिरत असताना आढळून आल्याने शिरपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.
याबाबत वृत्त असे की हद्दपार इसम नामे-राकेश रमेश थोरात वय ३० रा.खालचे गाव बौध्दवाडा शिरपूर जि. धुळे यास धुळे व नंदुरबार अशा ०२ जिल्यांमधुन ०२ वर्षासाठी हद्दपार केले आहे.
दि.३१/०३/२०२४ रोजी १७.४५ वाजेच्या सुमारास शिरपुर जि.धुळे शहरात शिरपुर शहर पो.स्टे.चे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना लाल बाग मध्ये हद्दपार इसम नामे-राकेश रमेश थोरात वय ३० रा. खालचे गाव बौध्दवाडा शिरपूर जि. धुळे हा हद्दपार आदेशाचे उल्लंघन करुन हद्दपार केलेल्या ठिकाणी शिरपुर जि.धुळे शहरात विनापरवानगी प्रवेश करुन फिरतांना मिळुन आल्याने त्यांनी शिरपुर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील चार्ज मा.उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर यांचे मार्गदर्शनाखाली हद्दपार इसमास शिताफीने ताब्यात घेवून त्याचे विरुध्द पोकों/नरेंद्र मोहन शिंदे यांचे फिर्यादीवरुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करुन उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.किशोर काळे व पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील चार्ज मा.उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक छाया पाटील, संदीप दरवडे, पोहेको/राजेंद्र रोकडे, पोकों/नरेंद्र शिंदे व चापोकों/रविंद्र महाले अशांनी मिळून केली आहे.
