भंडारी सभागृह शिरपुर येथे दोन सत्रात मतदान कर्मचारी प्रशिक्षण
शिरपूर - लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार लोकसभा मतदारसंघ व शिरपूर विधानसभा क्षेत्र अंतर्गत आज दि 7/4/24 रोजी भंडारी सभागृह शिरपुर येथे दोन सत्रात मतदान कर्मचारी प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी शिरपुर विधानसभा मतदार संघसाठी आज दि 7/4/24 रोजी पहिला प्रशिक्षण वर्ग रोज गोपाल भंडारी सभागृह येथे पार पडलेला आहे .
सदर प्रशिक्षण दोन सत्रात आयोजित करण्यात आले . सदर प्रशिक्षण साठी मार्गदर्शन हे शरद मंडलीक , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिरपुर व महेंद्र माळी , तहसीलदार शिरपुर तथा अति सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यानी मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे तसेच सर्व शंका निरसन केले आहे .
पहिल्या प्रशिक्षण सत्रात निवडणूक प्रक्रियेची माहिती अणि दुसऱ्या सत्रात EVM मशीन व VVPAT चे प्रात्यक्षिक स्वरुपात प्रशिक्षण घेण्यात आले . अभिरुप मतदानाची संपूर्ण प्रक्रिया , तसेच evm सीलिंग प्रक्रिया करून दाखविण्यात आली .
सदर प्रशिक्षण मतदान केन्द्रावरील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी असे एकूण 1865 कर्मचाऱ्यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले आहे .
गैरहजर कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये करवाई बाबत नोटिस देण्यात आली आहे
सदर प्रशिक्षण वेळी मतदान कर्मचारी यांचे पोस्टल बैलेट चे फॉर्म न 12 भरून घेण्यात आले आहेत.
Tags
news



