*मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद च्या वतीने महिला दिन उत्साहात संपन्न*
*महिला दिना निमित्त मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांना हिरकणी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले*
मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या हिरकणींना हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारार्थि प्राध्यापिका सौ. शारदा भामरे, दिपाली गवळी, योगीता पवार यांना हिरकणी पुरस्कार प्रदान करण्यात आला, याप्रसंगी मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवराजसिंग राजपुत, महाराष्ट्र राज्य सचिव प्रा. पवन जोशी व मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद चे अन्य पदाधिकारी उपस्थित होते, याप्रसंगी या पुरस्काराचे महत्त्व प्रा. पवन जोशी सर यांनी सांगितले तर युवराजसिंग राजपुत यांनी तमाम माता, भगीणी,महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
