भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई लाच घेताना रंगेहात अटक सुमित गिरासे शहादा प्रतिनिधी




भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई लाच घेताना रंगेहात अटक

सुमित गिरासे शहादा प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंग हात अटक केले आहे.

शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील आरोपी लोकसेवक विनोद बाळू शिंदे वय 42 पश्चिम वर्ग चार यांनी तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. म्हणून तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे भाव घेतली. दिनांक 13 मार्च 2024 रोजी सदर तक्रारीची पडताळणी करत दिनांक 16 मार्च 2024 रोजी प्रत्यक्ष लाच स्वीकारताना सदर लोकसेवकास अटक करण्यात आली.

तक्रारदार यांचे वडीलोपार्जि्त शेतजमिनीची दि. ०४/१०/२०२३ रोजी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करण्यात आलेली होती. परंतू काही कारणास्तव तक्रारदार यांना सदर शेतजमिनीची पुन्हा फेरमोजणी करावयाची असल्याने फेरमोजणीचे अर्जासह भूमी अभिलेख कार्यालय येथे गेले होते.
           तेव्हा भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई विनोद शिंदे यांनी तक्रारदार यांना तुम्ही अर्ज करू नका, मी तुमचे शेतात येऊन मोजणी करून देतो, त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला ३,०००/-रू. देवून द्या, असे सांगून लाचेची मागणी केली.
         याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि.१३/०३/२०२४ रोजी पंचांसमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आलोसे शिंदे यांनी ३,०००/- रू. लाचेची मागणी करुन मागणी केलेली लाचेची रक्कम ३,०००/- रू. दि.१६/०३/२०२४ रोजी पंचसाक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली, म्हणून गुन्हा दाखला करण्यात आला.

सदरची कारवाईमा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम,
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक., मा.श्री.माधव रेड्डी सो.अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. श्री.नरेंद्र पवार सो.वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षण अधिकारी  
राकेश आ. चौधरी,पोलीस उप अधीक्षक, 
ला.प्र.वि., नंदुरबार, सापळा अधिकारी माधवी समाधान वाघ,पोलीस निरीक्षक,   ला.प्र.वि. नंदुरबार.  पोहवा/विलास पाटील, पोहवा/विजय ठाकरे, पोना/हेमंत महाले व पोना/सुभाष पावरा सर्व नेम. ला.प्र.वि.,  नंदुरबार पोनि/समाधान वाघ
ला.प्र वि. नंदुरबार तसेच पोना/संदीप खंडारे, चापोना/जितेंद्र महाले, सर्व नेम. ला.प्र.वि., नंदुरबार यांच्या पथकाने केले आहे.            
 
 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने