*रोटरी स्कूलचा बक्षीस**
*वर्षभरातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा*
**डॉ मुकुंद सोहनी**
दोडाईचा (मुस्तफा शाह)
दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. नयनकुंवरताई रावल, शाळेचे उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी तर मान्यवर म्हणून नगरसेविका सौ. वैशाली महाजन, सौ. भावना महाले, सौ.अनुराधाताई सोहोनी, प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक उपस्थित होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या समारंभात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शालांतर्गत वक्तृत्व, गीतगायन, हस्ताक्षर, रांगोळी, प्रश्नमंजुषा, शुभेच्छा पत्रे बनविणे, टाकाऊपासून टीकाऊ वस्तू बनविणे, राखी बनविणे, निबंध, कथालेखन, भूमिकाभिनय, वर्गसजावट,विज्ञान प्रदर्शन अशा विविध अभ्यासपूरक सहशालेय उपक्रमात व ऑलिंपियाड परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य, कास्य पदक व प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले.
प्राचार्य श्रुतिरंजन बारिक यांनी प्रास्ताविकात शाळेत वर्षभर बौध्दिक, शारीरिक, भावनिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांच्या कृतिशिलतेला वाव मिळण्यासाठी विविध सहशालेय उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.
डॉ. मुकुंद सोहोनी म्हणाले की, वर्षाच्या 365 दिवसांतील प्रत्येक दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन काम करावे. जीवनात येणाऱ्या संकटांवर प्रयत्नांच्या जोरावर मात करून यशाचे शिखर गाठता गाठावे.
सौ. वैशाली महाजन यांनी शाळेच्या प्रगतीची आणि विविध स्पर्धेत यशसंपादन केल्याची बातमी नियमितपणे वर्तमानपत्रात येत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबर इतर उपक्रमात सहभाग घेवून आपल्या अंगी असणाऱ्या कौशल्यांचा विकास करावा. आज करिअरच्या विविध संधी उपलब्ध असल्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे. असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी किर्ती शाह, निकिता जैन, शितल पाटील यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन ललिता गिरासे व सुचेता पाटील यांनी केले तर आभार सुवर्णा जाधव यांनी मानले.
