५० वर्षांपासून शासकीय आश्रमशाळेला इमारत नाही;आदिवासी विकास मंत्र्याचे दुर्लक्ष* *प्रकल्प अधिकारी नंदूरबार यांना बिरसा फायटर्सचे निवेदन*



५० वर्षांपासून शासकीय आश्रमशाळेला इमारत नाही;आदिवासी विकास मंत्र्याचे दुर्लक्ष* 

*प्रकल्प अधिकारी नंदूरबार यांना बिरसा फायटर्सचे निवेदन* 
  
नंदूरबार:५० वर्षां पूर्वी सुरू झालेल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शहाणा ता.शहादा  या आश्रमशाळेची शासकीय इमारत व्हावी,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित व प्रकल्प अधिकारी नंदूरबार चंद्रकांत पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,गोपाल भंडारी,करण सुळे,धनायुष भंडारी,पवन सुळे,रमेश पटले,रवींद्र नावडे,भावसार मोते, चिका भोसले, धना ठाकरे,रायमल पवार, करण पटले,भाईदास चव्हाण, मांगीलाल पावरा,शशिकांत पावरा,दिलवरसिंग पाडवी,हारसिंग भील, फेंदा वळवी,फुलसिंग वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                     ५० वर्षां पूर्वी सुरू झालेल्या शहादा तालुक्यातील शहाणा येथे   शासकीय आदिवासी आश्रमशाळेला अद्याप शासकीय इमारत नाही.शाळा खाजगी भाड्यांच्या इमारतीत भरत आहे.ही अत्यंत खेदाची बाब आहे.एकात्मिक आदिवासी विकास  प्रकल्प नंदूरबार अंतर्गत एकुण ३२ शासकीय आदिवासी आश्रम शाळांचा समावेश होतो.त्यापैकी २७ शाळांना शासकीय इमारत आहे,४ शाळांचे इमारत बांधकाम सुरू आहे.फक्त शहाणा येथील आश्रमशाळेला अद्याप इमारत नाही.खाजगी इमारतीची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे विद्यार्थांचे हाल होत आहेत. 
              सरकार विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारत आहे.परंतु सर्वसामान्यांपर्यंत सोयी सुविधा पोहोचत नाहीत, त्याचे हे चित्र आहे.आदिवासी विकास विभाग अंतर्गत आदिवासी विद्यार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. परंतु ५० वर्षे झाले तरी आदिवासी विकास विभागाचे शासन शहाणा आश्रमशाळेला इमारत देऊ शकले नाही.आदिवासी विकास विभागाला दरवर्षी हजारों कोटी रूपये निधी दिला जातो,तरीही शहाणा सारख्या गावात आश्रमशाळेला अद्याप इमारत नाही.ही एक दुर्दैवाची बाब आहे.शाळेला इमारत नसल्यामुळे विद्यार्थांना भौतिक सुविधांचा अभावाने शैक्षणिक नुकसान होत आहे.तरी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शहाणा ता.शहादा या आश्रमशाळेला लवकरात लवकर इमारत बांधून द्यावी,हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने