दोंडाईचा पोलीसांच्या वतीने विना क्रमांक आणि फॅन्सी प्लेट दुचाकी वाहनांवर करडी नजर ; त्रिसूत्री कारवाई...** दोंडाईचा- (अख्तर शाह.)




दोंडाईचा पोलीसांच्या वतीने विना क्रमांक आणि फॅन्सी प्लेट दुचाकी वाहनांवर करडी नजर ; त्रिसूत्री कारवाई...**


दोंडाईचा- (अख्तर शाह.) शहरात विना क्रमांक किंवा फॅन्सी क्रमांकाच्या प्लेट लावून दुचाकी फिरवणाऱ्यांवर दोंडाईचा पोलिस करडी नजर ठेवून `ॲक्शन`, `रिअक्शन`, आणि `सोल्युशन`, अशी त्रिसूत्री कारवाई सुरू केली आहे. 



      शहरात गेल्या कित्येक दिवसापासून वाहतूक नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट तसेच अल्पवयीन मुले दुचाकी वाहने नियम तोडून वाहन चालवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. उद्या पोलीस ठाण्यांतर्गत अशा कारवाई होत नसल्याने नाराजीचा सूर उमटत होता.  
याला दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सा. पोलीस  निरीक्षक यांनी नुकताच पदभार घेतल्यानंतर विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट यासह आदी दुचाकी स्वरांवर करडी असल्याचे बघायला मिळत आहे. शहरात  दुचाकीवरून येत लुटीचे घडत असतात.  गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी वाहनावरील क्रमांक महत्त्वाचा ठरतो त्यामुळे गुन्हा घडला पहिले वाहन आणि त्यानंतर त्याचा क्रमांक पोलिसांकडून तपासला जातो परंतु अलीकडच्या काळात दोंडाईचा शहरात विना क्रमांक दुचाकी, फॅन्सी नंबर प्लेटच्या दुचाकींची संख्या वाढली आहे. गुन्हेगारी देखील वाढले आहे. पोलिसांकडून उपाय योजना होतात. परंतु ठोस असे काही साध्य होत नाही. असारा प्रकार बघता सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी शहरातील विना क्रमांक फॅन्सी नंबर प्लेटवर ॲक्शन, रिअक्शन आणि सोल्युशन अशी त्रिसूत्री कारवाई सुरू केले आहे..
 दि. 4 रोजी संध्याकाळच्या सुमारास शहरातील राजपथ रस्त्यावरील ग्यानचंद मेडिकल समोर विना नंबर, ट्रिपल सीट व विदाऊट लायसन विविध कारवाई करण्यात आली..
शहरातील सा. पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी पदभार हाती घेतल्यानंतर वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून सात हजार रुपयांच्या आसपास ऑनलाईन दंड वसूल करण्यात आला होता. 
त्याच प्रमाणे दि. ५ रोजी शहरातील राजपथ रस्त्यावरील ग्यानचंद मेडिकल जवळ नाकाबंदी करून विना नंबर प्लेट तसेच विविध वाहतूक नियम मोडणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी काही विना नंबर प्लेट दुचाकी स्वारकडून दंड न वसूल करता जागेवरच सा. पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी  नंबर प्लेट बनवून दुचाकी स्वरांना देण्यात आल्या. या कारवाईचे शहरातील नागरिकांनकडून स्वागत करण्यात येत आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश काळे, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सा. पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी लक्ष घालून उपनिरीक्षक हेमंत राऊत, चांगदेव हांडोरे, परिविक्षाधीन उपनिरीक्षक नकुल कुमावत होमगार्ड प्रमुख अनिल ईशी, पोलीस कर्मचारी पुरूषोत्तम पवार यासह आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते....



प्रतिक्रिया.....

यापुढे दोंडाईचा शहरातील विना नंबर प्लेट, विना लायन्स, फॅन्सी नंबर प्लेट यासह आदींनी वाहतूक नियमातच वाहन चालवावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा ईशारा साह. पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांनी दिला आहे....

निलेश मोरे,,
साह. पोलीस निरीक्षक दोंडाईचा पोलीस ठाणे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने