प्रियसी ने घातला लग्नाचा घाट, घात करून तिच्या जीवाची लावली वाट
खूनाच्या गुन्ह्यात कोणतेही धागेदोरे नसताना उकल करण्यात पालघर पोलीसांना यश
शिरपूर - पालघर तालुक्यात घडलेल्या खुनाच्या घटना व त्याचे दहावी शिरपूर तालुक्यात मिळून आल्याने पालघर पोलिसांनी यशस्वी तपास करून या गुन्ह्यातील मारेकऱ्यांना अटक करून यशस्वी तपास पूर्ण केला आहे.
दि.०७/०२/२०२४ रोजी १०.२० वाजता चे पूर्वी नक्की वेळ माहित नाही मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील कारेगांव चे शिवारात खोडाळा ते कसारा जाणारे रोडवरील वैतरणा नदीवरील पुलाखाली अनोळखी स्वी वय ३० ते ३५ वर्षे हीस अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन तीचे मुंडके कोणत्यातरी धारधार शस्त्राने धडा वेगळे करुन ते पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने पुलावरुन खाली टाकुन जिये ठार मारले म्हणून मोखाडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २२/२०२४ भा.दं.चि.सं. कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री, बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, यांनी श्री. गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा पालघर व श्री. प्रदिप गिते, प्रभारी अधिकारी, मोखाडा पोलीस ठाणे यांना वेगवेगळी तपास पथके तयार करून तपासाबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या. त्या अनुषंगाने पोउपनि/स्वप्नील सावंतदेसाई व पोउपनि/रविंद्र वानखेडे यांचे पोलीस पथक तयार केले. सदर पथकाने मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, कल्याण, मुंबई तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील पोलीस ठाणे यांचेशी संपर्क केला. परंतु मयत महिलेची कोणतीही माहिती प्राप्त झाली नव्हती.
मयत महिला हिचे उजव्या हातावर ममता असे नाव गोंदलेले होते तसेच पायामध्ये चांदीचे जोडवे त्यावर SDS असा मार्क होता. मयत महिलेल्या पायातील जोडव्याआधारे माहिती प्राप्त केली असता सदरचे जोडवे हे शिरपूर जिल्हा धुळे येथील SDS (सुधाकर दिपचंद सोनार) दिक्षा ज्वेलर्स चे मालक यांचेकडे तयार केल्याचे व ते पावरा समाजाचे महिला वापरत असल्याचे निष्पन्न झाल्याने शिरपुर तालुक्यातील मतदार यादी तपासली असता सुमारे ४४५ ममता नाव असलेल्या महिला यांची यादी संकलीत केली. शिरपुर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांची बैठका घेतल्या सदर बैठकामध्ये त्यांना गुन्हयातील हकिकत सांगीतली व त्या भागातील पोलीस पाटील यांचे वॉटसअॅप ग्रुप तयार केले व त्यावर गुन्हयाची शोध पत्रीका पाठवुन त्वादवारे माहिती घेतली असता मयत ही मौजे लाकडे हनुमान ता. शिरपुर, जिल्हा धुळे येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्याअनुषंगाने अधिक माहिती प्राप्त केली असता यातील मयत व आरोपी सुनिल उर्फ गोविंद यादव यांचेत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार तांत्रिक व गोपणीय माहितीच्या आधारे आरोपी क्र. ०१ सुनिल उर्फ गोविंद यादव चय ४५ वर्षे रा. सोलापुर मूळ रा. खेंचा ता. जि. महाराजगंज राज्य उत्तरप्रदेश यास सोलापुर येथुन च आरोपी क्र. २ महेश रविंद्र बडगुजर उर्फ विक्की वय ३१ वर्षे रा. बोराडी ता. शिरपुर जिल्हा धुळे यास त्याचे राहते ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीत यांचेकडे कसून चौकशी केली असता सदर मयत महिला आरोपी क्र. १ यास लग्न करण्यास व प्रॉपर्टी नावावर करून देण्यास बळजबरी करत होती. त्यावरून त्यांचेत वाद होऊन आरोपीत क्र. १ याने आरोपी क्रमांक २ याचेशी संगनमत करून मयत हिस लोणावळा येथे फिरावयास जायचे आहे असे सांगुन तिस सोचत घेऊन इटिंगा गाडीने पालघर जिल्ह्यातील मौजे कारेगावचे हद्दित आणून तिचा रुमालाने गळा आवळून जिवे ठार मारून तिचा खून करून तिचे मुंडके धडावेगळे करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने वैतरणा नदीवरील पुलाखाली आणून टाकल्याचे आरोपीने कबुल केले आहे.
सदर दोन्ही आरोपी यास ताब्यात घेण्यात आलेले असून गुन्ह्याचा अधिक तपास हा श्री. गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा पालघर श्री. प्रदिप गिते, प्रभारी अधिकारी, मोखाडा पोलीस ठाणे, पोउपनि/स्वप्नील सावंतदेसाई, पोउपनि/रवींद्र वानखेडे, पोहवा/राकेश पाटील, पोहवा / कपिल नेमाडे, पोहवा/ संजय धांगडा, पोहवा/ कैलास पाटील, पोहचा/ दिनेश गायकवाड, पोहवा/ नरेंद्र पाटील, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच पोहवा/विशाल पाटील, पोशि वाल्मीक पाटील, पोशि/रोहित तोरस्कर नेमणुक सायबर पोलीस ठाणे, पालघर यांनी केली आहे.
