बिजवडी ग्रुप ग्रामपंचायती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्षाच्या वतीने अनेक कार्यकर्त्यांना पदभार जाहीर
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे :इंदापूर तालुक्यातील बिजवडी ग्रुप ग्रामपंचायत एक मोठी ग्रामपंचायत मानली जाते या ग्रामपंचायत हद्दीत कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना व अशा अनेक लहान मोठ्या संस्था आहेत . तसेच उजनी बॅकवॉटर मुळे शेती देखील बागायती आहे. ही ग्रामपंचायत इंदापूर तालुक्याच्या राजकारणात नेहमीच निर्णायक ठरत असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी या ग्रुप ग्रामपंचायती मध्ये हनुमंत भिसे यांची इंदापूर तालुका संघटक, संतोष कांबळे महाराज यांची सामाजिक न्याय विभागाच्या तालुका उपाध्यक्ष, तर संदेश विठ्ठल ढावरे यांची सामाजिक न्याय संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या महासंसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष ॲड तेजसिह पाटील कार्याध्यक्ष महारुद्र पाटील महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य अमोल भिसे , युवक तालुका उपाध्यक्ष इंदापूर रायचंद नरळे, शहराध्यक्ष इनायतअली काझी शहर कार्याध्यक्ष डोनाल्ड शिंदे ॲड आशुतोष भोसले शहर उपाध्यक्ष संजय सानप सामाजिक न्याय शहराध्यक्ष अनिल ढावरे सामाजिक न्याय तालुका कार्याध्यक्ष विकास खिलारे इंदापूर शहर युवक कार्याध्यक्ष अजिंक्य ढाणे उपस्थित होते
