पिस्तुलाचा धाक दाखवीत भर दिवसा 67 लाखांचे सोने लुटले ;*
*शहादा तालुक्यातील तऱ्हाडी ते ठेंगचे दरम्यानची घटना*
शहादा. -
शहादा तालुक्यातील बोरद वळण रस्त्यावर तऱ्हाडी ते ठेंगचे गावादरम्या पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून १ किलो ४०० ग्रॅम वजनाचे ६७ लाख २०हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व सोने लुटल्याची घटना काल दिनांक 23 रोजी घडली सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास या रस्ता लुटी दरम्यान सराफा दुकानातील मुनीम व ड्रायव्हर या दोघांनाही अज्ञात दरोडेखरांनी पिस्तुलाचा धाक दाखवीत शिंदखेडा शहरापर्यंत आपल्या सोबत नेले व तेथून ते फरार झाले या रस्ता लुटीमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे
. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल दिनांक 23 मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पार्थ ज्वेलर्सचे संचालक संजय सोनार यांच्या दुकानातून त्यांचे मुनीम विलास बर्डे (रा टवळाई ता. शहादा व चालक प्रकाश कापुरे,,( रा. शहादा ) हे नेहमीप्रमाणे क्रमांक एमएच 39 जे 8138 या त्यांच्या मालकीची इकोस्पोर्ट कारने अक्कलकुवा, खापर ,तळोदा या गावातील व्यापाऱ्यांना सोन्याचे दागिने व सोने देण्यासाठी निघाले सुरुवातीला तळोद्यातील व्यापाऱ्यांना दागिने व सोने द्यावयाचे असल्याने ते शहादा येथून नेहमीच्या मार्गाने पिंगाने - बोरद बायपास रस्त्याने निघाले सकाळी साडेदहाच्या सुमारास तऱ्हाडी ते ठेंगचे या गावादरम्यान वळण रस्त्याजवळ एक निळ्या रंगाची कार क्रमांक एमएच 01 बीके - 1449 या कारने त्यांना ओव्हरटेक करीत त्यांच्या कारला अडविले त्या कार मध्ये चार जण बसलेले होते पैकी तीन जण खाली उतरले त्यांनी मुनीम विलास याला दरवाजा उघडायला लावून त्याच्या कानाला पिस्तूल लावली व दोघांना सज्जड दम भरताना काहीही हालचाल केली अथवा आरडाओरड केली तर आम्ही तुम्हाला गोळी घालून ठार मारूअसे धमकावल्याने घाबरलेल्या अवस्थेत ते दोघेही शांत बसले त्यानंतर ते तिघेही दरोडेखोर त्यांच्या कारमध्ये बसले दोघांना मागे बसवून त्या खूपदरोडेखरांनी थेट शहादा शहराला वळसा घालून लोणखेडा बायपासने ते सर्वजण शिंदखेडा येथे पोहोचले शिंदखेडा गावालगत आशापुरी मातेच्या मंदिरा जवळ त्या दरोडेखोरांनी त्या दोघांकडून सोन्याचे दागिने व सोने हिसकावून घेतले शिवाय त्यांच्या जवळील मोबाईल मधील सिम कार्ड काढून घेतले व या घटनेची वाचता करू नका अन्यथा आमच्याशी गाठ आहे असा दम देत त्यांच्या कारच्या टायरची हवा काढून त्यांनी सोबत आणलेल्या निळ्या रंगाच्या कारमधून पोवारा करी ते चारही दरोडेखोर फरार झाले घटना घडल्यानंतर मुनीम विलास व चालक प्रकाश हे दोघे दुपारी एक वाजेच्या दरम्यान, शहादा येथे पोचल्यानंतर मालक संजय सोनार यांना आम्हाला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवीत आमच्या जवळील सोने व दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याचे सर्व हकीगत कथन केली त्यानंतर संजय सोनार यांनी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना सर्व घटनाक्रम सांगितला
दरम्यान, पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करीत पोलीस निरीक्षक बुधवंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर यांना घटनेची माहिती दिली गुन्हा शाखेच्या पथकाने तात्काळ शहादा येथे येऊन या घटनेचा तपास सुरू केला आहे शहादा पोलिसात पार्थ ज्वेलर्सचे मुनीम विलास रणसिंग बर्डे यांच्या फिर्यादीवरून या चारही अज्ञात दरोडेखोरांविरोधात कलम 394, 341 सह भारतीय हत्यार कायदा कलम ती३ /२५, ४/ २५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण कोळी करीत आहेत
