खुनाचे गुन्हयाचा 48 तासात उलगडा करुन आरोपींना अटक करण्यात नंदुरबार पोलीसांना यश नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे



खुनाचे गुन्हयाचा 48 तासात उलगडा करुन आरोपींना अटक करण्यात नंदुरबार पोलीसांना यश

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे

शहादा पोलीस ठाणे हद्दितील रहिवासी असलेल्या तक्रारदार श्रीमती मिनाक्षी राजेंद्र मराठे रा. सदाशिव नगर, शहादा यांनी दिनांक 14/03/2024 रोजी शहादा पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार दिली की, त्यांचे पती श्री. राजेंद्र उत्तमराव मराठे वय 53 वर्षे रा. सदाशिव नगर, शहादा हे दिनांक 14/03/2024 रोजी 16.00 वा. सुमारास मार्केटमध्ये किराणा खरेदी करण्यासाठी गेले असून ते अद्याप घरी आलेले नाही. त्यांच्या तक्रारीवरून शहादा पोलीस ठाणे येथे क्रमांक 12/2024 प्रमाणे मिसिंग दाखल करण्यात आली.

सदर मिसिंग तपासाच्या दरम्यान जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातील डायल-112 वर शहादा येथील एका सतर्क नागरिकाने कॉल करुन कळविले की, तावद रस्त्याचे पुलाचे खालो प्रेत जळालेल्या अवस्थेत पडलेले आहे. त्यावरुन तात्काळ घटनास्थळी शहादा पोलीस प्रभारी श्री. शिवाजी बुधवंत व स्टाफ असे पोहचून प्रेताची पाहणी केली व मयताचा मुलगा याने ते प्रेत त्याचे वडील राजेंद्र उत्तमराव मराठे याचे असल्याचे सांगितले. त्यानुसार मयताची मुलगी श्रीमती भावना राजेंद्र सरोदे (मराठे) रा. सदाशिव नगर, शहादा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द शहादा पो. ठाणे गु.र.नं. 229/2024 भा.दं.वि. कलम 302, 201 प्रमाणे दिनांक 17/03/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे (अति. कार्यभार), शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार, शहादा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. शिवाजी बुधवंत तसेच स्थानिक गुन्हे शाखा, प्रभारी श्री. किरणकुमार खेडकर यांनी स्वतंत्र तपास पथके तयार करुन तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान पोलीसांना गोपनीय माहिती व तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदरचा गुन्हा हा निलेश ऊर्फ तुकाराम बच्चु पाटील रा. सालदार नगर, शहादा याने त्याच्या साथीदार अशांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले, व सदर आरोपी हे मुंबई व बाहेर राज्यात असल्याचे समजून आल्याने सदर ठिकाणी पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त.एस यांनी तात्काळ वेगवेगळी पोलीस पथके तयार करुन रवाना केले. त्याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबारचे पथक मुंबई येथे सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी यांचे शोधात असतांना मुंबई पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखा, कांदिवली पश्चिम, मुंबई यांचे मदतीने आरोपी नामे 1) निलेश ऊर्फ निलु बच्चू पाटील वय-25 वर्षे, रा. सालदार नगर, शहादा 2) लकी किशोर बिरारे वय 18 वर्षे रा. भादा ता. शहादा व त्यांच्या सोबत दोन विधी संघर्ष बालके यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. व त्यांनी त्यांचे गुन्हयातील साथीदार ।) गोविंद सुरेश सोनार वय-34 रा. गुरुकुल नगर, नंदुरबार 2) जयेश मगन सुतार वय-30 रा. मुरली मनोहर कॉलनी, मलोनी, शहादा यांची माहिती दिली. त्यांना देखील पोलीसांनी ताब्यात घेतले व शहादा पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले.

सदर गुन्हयात आरोपी गोविंद सोनार याचा मयताची मुलगी (फिर्यादी) भावना हिचेशी प्रेमविवाह झाला होता. आरोपीचे पत्नीसोबत कौटुंबिक वाद होते, त्यामुळे आरोपी व फिर्यादी हे विभक्त राहत होते. दरम्यानच्या कालावधीत आरोपीच्या वडीलांचे निधन झाले. त्यातून आरोपी गोविंद सोनार याने आरोपी निलेश पाटील व त्यांचे सहका-यांसोबत कट रचून जीवे ठार मारले, तसेच त्याचे प्रेत पुलाखाली फेकून त्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून ते जाळले होते.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्री. श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. सदाशिव वाघमारे (अति. कार्यभार), शहादा उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे पोलीस अंमलदार अभय राजपुत, शोएब शंख, दिपक न्हावी, शहादा पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस नाईक योगेश थोरात, घनश्याम सुर्यवंशी, संदीप लांडगे, पोलीस अंमलदार मुकेश राठोड, योगेश माळी, दिनकर चव्हाण, भरत उगले, अनमोल राठोड यांनी केली आहे.

तसेच जिल्हयातील नागरिकांनी आपल्या आजुबाजूला घडणा-या गंभीर घटनांविषयी माहिती तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष डायल-112 वर दयावी, जेणेकरुन घडणा-या घटनांवावत पोलीसांना तात्काळ दखल घेता येईल, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांनी केले आहे."

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने