थाळनेरला मोफत आरोग्य शिबिर संपन्न
थाळनेर(प्रतिनिधी)
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात मोफत आरोग्य शिबिर नुकतेच संपन्न झाले.
या शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त महिला सरपंच मेघा संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे तालुका अध्यक्ष हेमंत चौधरी, सामाजिक कार्यकर्ते उज्वल निकम, संदीप पाटील आदी उपस्थित होते. परम पूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल मार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गावातील नागरिकांची सर्व प्रकारच्या रोगावर तपासणी करून माफक दरात औषधी उपलब्ध करून देण्यात आली. या शिबिरासाठी डॉ. प्रवीण पवार डॉ.शुभांगी गोरेकर यानी रुग्णाची तपासणी करून उपचार केले. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. शिबिर यशस्वीते साठी प्राचार्य शामकांत ठाकरे, शोभाताई दीपक साळुंखे, भीमसिंग जमादार, धुळे येथील केंद्राचे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.
