शासन दरबारी मागण्या पूर्ण न झाल्याने आशा गटप्रवर्तकांचे जेलभरो आंदोलन
शिरपूर- आशा गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्या मान्य करूनही त्या संदर्भात शासन जीआर काढत नसल्याने (आयटक )संलग्न शिरपूर तालुक्यातील आशा गटप्रवर्तक यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे केले जेलभरो आंदोलन. दिनांक 3/2/2024 रोजी ठीक 12.30 pm ला चोपडा जीन एसटी बस स्टॅन्ड पासून दोन दोन च्या लाईन ने भव्य मोर्चाचे आयोजन करुन पायी मोर्चा काढुन शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे जाहीर सभेचे आयोजन करून जेलभरो आंदोलन करण्यात आले.यावेळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे मा.मुख्य पोलीस निरीक्षक यांना मागणीचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली . तसेच या निवेदना मार्फत मा. मुख्यमंत्री,मा. उपमुख्यमंत्री,मा. आरोग्य मंत्री यांनाही इशारा देण्यात आला की तीन महिने होऊ गेले तरीआपण दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. म्हणून आजचे हे जेलभरो आंदोलन करण्यात आले. तसेच लवकरात लवकर जीआर न काढल्याने येणाऱ्या पुढील काळात आमरण उपोषण करू आणि जीआर घेतल्याशिवाय आम्ही उपोषण थांबवणार नाही . एकतर जीआर द्या नाहीतर आशांचे प्राण घ्या अशा तीव्र शब्दात उपोषणाची दिशा ठरवू असे सांगण्यात आले. तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली. तोंडासमोर घास दाखवून परत घास हिसकावून घेण्यासाठी सरकार विचार करत असेल म्हणून जीआर देण्यासाठी शासन टाळाटाळ करत आहे असेही विचार मांडण्यात आले.
यावेळी आशा गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हिरालाल परदेशी , तालुका अध्यक्ष अरुणा सूर्यवंशी, तालुका कार्याध्यक्ष स्मिता दोरीक,गटप्रवर्तक छाया चव्हाण, आशा वडवी, आशा मैराळे, पुष्पाताई पाटील, आक्का पावरा, तसेच आशा कार्यकर्ती बबीता पावरा, स्वाती बडगुजर, ललिता पाटील, शिला भील, भावना मोरे, कल्पना कोळी, रत्नाबाई पाटील, वर्षा गवळी, वैशाली बुवा, कविता सोनवणे, ज्योती पाटील, स्नेहल पाटील, अशा असंख्य आशा उपस्थित होत्या.
